भावांच्या विजयासाठी रितेश देशमुख सहकुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:30 PM2019-10-02T16:30:00+5:302019-10-02T16:31:25+5:30
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. त्यातच रितेश आणि जेनिलिया आल्याने त्यांना पाहण्यासाठी उपस्थित भाविकांनी गर्दी केली होती. यावेळचे फोटो रितेश देशमुखने फेसबुकवर शेअर केले आहे.
मुंबई - माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच धीरज देशमुख तुळजापुरात दाखल झाले असून त्यांनी आई, पत्नी, भाऊ अभिनेता रितेश देशमुख आणि वहिणी जेनिलिया देशमुख यांच्यासह तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
विलासराव देशमुख यांचे मोठे चिरंजीव अमित देशमुख आधीच आमदार आहेत. तर धीरज देशमुख जिल्हा परिषद सदस्य आहेत. परंतु, धीरज यांनी आता आमदारकीसाठी धडक मारली आहे. त्यांना लातूर ग्रामीण मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसकडून नुकतीच 52 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये धीरज देशमुख यांचा समावेश आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी तुळजाभवानीच्या दर्शनाने प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बंधू अमित देशमुख गैरहजर असले तरी रितेश आणि जेनिलिया देशमुख आवर्जुन उपस्थित होते. अमित देशमुख देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. त्यातच रितेश आणि जेनिलिया आल्याने त्यांना पाहण्यासाठी उपस्थित भाविकांनी गर्दी केली होती. यावेळचे फोटो रितेश देशमुखने फेसबुकवर शेअर केले आहे.