शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

अवघ्या 15 हजारांसाठी रिझवानची निष्ठा इसिसशी

By admin | Published: July 25, 2016 9:09 PM

वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक या आयआरएफ (इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन) या संस्थेचा निष्ठावान म्हणून गेल्या आठ वर्षापासून काम करणा:या कल्याणच्या रिझवान खानने

जितेंद्र कालेकरठाणे : वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक या आयआरएफ (इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन) या संस्थेचा निष्ठावान म्हणून गेल्या आठ वर्षापासून काम करणा:या कल्याणच्या रिझवान खानने आपल्या गरजा अगदी मर्यादीत ठेवल्या होत्या. तो खासगी शिकवणी वर्ग घेत असला तरी दहशतवादी संघटना असलेल्या इसिसच्या कारवायांसाठी त्याला अवघे दहा ते 15 हजार रुपये मिळत होते. केवळ नववीर्पयत शिकलेल्या रिझवानने तरुण तरुणींना इसिसमध्ये ओढण्यासाठी आधी त्यांचे धर्मातर करण्याचा सपाटाच लावला होता. गेल्या सात ते आठ वर्षात त्याने अशा 700 जणांचे धर्मातर केल्याची माहिती एटीएसच्या तपासात स्पष्ट झाली आहे.

कोणाच्याही मदतीसाठी धावून जाणा:या रिझवानची भारतभरातील सर्वच मुस्लीम सामाजिक संघटनांशी चांगला परिचय आहे. तामिळनाडूतील तिरपत्तू हे त्याचे मूळ गाव. शिक्षण फक्त नववीर्पयत. 1991 मध्ये तो मुंबईत आला. त्यावेळी रेल्वेत कात्री, कुलूप, पेन अशी सामग्री विकण्याचा त्याचा व्यवसाय. पुढे 1997 ते 2005 या काळात मुंबईतल्या वेगवेगळया पदपथांवरच पथारी मांडून तो झोपायचा. दरम्यान, भेंडीबाजारातील साबू सिद्दीक कॉलेजसमोरील खेरमत ट्रस्ट, इमामवाडा येथे रात्री झोपण्यासाठी त्याला जागा मिळाली. सुमारे चार वष्रे तिथे तो वास्तव्याला होता.

पुढे दुकानांमध्ये हार्डवेअरचे सामान पुरविण्याच्या कामास त्याने सुरुवात केली. कट्टर धार्मिक असल्यामुळे इज्तेमा तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्याचा नेहमीच पुढाकार असे. केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक, वैद्यकीय मदतीसाठीही अडल्या नडलेल्यांच्या मदतीसाठी धावून जाणो तसेच तरुण तरुणींची लगअ‍े जमविणो यात त्याची विशेष आवड. त्यामुळेच खेरमत ट्रस्टसह अनेक संस्था आणि लोकांमध्ये त्याला प्रतिष्ठाही होती. ट्रस्टमध्ये देशभरातून अनेक वेगवेगळया प्रकारच्या लोकांचा वावर होता. तिथेच तो डॉ. झाकीर नाईकच्या विचारांनी प्रभावित झाल्याने त्यांच्या आयआरएफमध्ये 2008 पासून सामील झाला. पुढेही महिलांना मदत करणो, मुलांना वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदतीसाठी वेगवेगळया ट्रस्टमार्फत विनामोबदला मदत मिळवून देण्याचे त्याचे काम सुरुच होते.

चांगली सामाजिक कामे करीत असल्यामुळे लोकांचाही त्याच्यावर विश्वास बसला. यातूनच आर्शीद कुरेशी या आयआरएफच्या पीआरओ मार्फत त्याने तरुणतरुणींना इसिसमध्ये ओढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यासाठी हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन अशा वेगवेगळया धर्मातील तरुणांचे इस्लाममध्ये धर्मातर करण्यास तो प्रवृत्त करु लागला. सुरुवातीला आढेवेढे घेणा:या या तरुणांवर तो डॉ. नाईकच्या विचारांचा प्रभाव टाकायचा. धर्मातर करण्यासाठी कोणताही मोबदला न घेता त्याची कायदेशीर बाबींची पूर्तताही तो करीत होता. त्यामुळे एखादी व्यक्ती तयार झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण कायदेशीर बाबी तो अत्यंत लीलया हाताळत होता. अशा किमान 7क्क् जणांचे त्याने आतार्पयत धर्मातर केल्याची माहिती एटीएसच्या तपासात स्पष्ट झाली आहे. ............त्याबाबतची अनेक कागदपत्रेही तपास पथकाच्या हाती लागली आहेत. धर्मातर केलेल्यांना पुढे ह्यइसिसह्णमध्ये जाण्यास प्रवृत्त केले जात होते. आर्शीद आणि रिझवानने अशा किती जणांना इसिससाठी प्रवृत्त केले, त्यातील केरळच्या एका दाम्पत्यासह किती जण गेले किंवा जाण्याच्या मार्गावर होते? याचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिका:याने लोकमतला दिली.