मुंबई : मुंबईत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, जानेवारी ते जुलै २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १२ हजार ९९५ रस्ते अपघात होऊन, त्यामध्ये २९२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुंबईत साधारणपणे रोज २६ लाख वाहने धावत असून, मुंबईच्या बाहेरून दीड लाख वाहने रोज ये-जा करत असतात. भरधाव वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, दारू पिऊन वाहन चालवणे, निष्काळजीपणा, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, यामुळे हे अपघात घडत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. याबाबतचा प्रश्न मुझफ्फर हुसैन सय्यद, संजय दत्त, भाई जगताप आदी सदस्यांनी विचारला होता.
रस्ते अपघातात वाढ
By admin | Published: March 17, 2016 12:43 AM