केंद्रीय परिवहन मंत्री घेणार बैठक : नागपूरशी संबंधित महामार्गांना प्राधान्यनागपूर : राज्याशिवाय आता लवकरच नागपूरच्या आजूबाजूच्या अपूर्ण रस्त्यांच्या योजनांना गती मिळणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी १४ जूनला रविभवनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीत विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांसह राज्यातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान नागपूरपासून जवळच असलेल्या महामार्गांच्या कामांना प्राधान्य मिळू शकणार आहे. लोकमतने २७ मे रोजी जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या रस्त्यांच्या योजनांवर वृत्त प्रकाशित केले होते. यात नागपूरजवळील महामार्गांची स्थिती आणि अपूर्ण कामांची विस्तृत माहिती देण्यात आली होती. नितीन गडकरी यांनी परिवहन मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वैदर्भीयांच्या अपेक्षांशी निगडित वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दोन आठवड्यातच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आहे. गडकरींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अधिकाऱ्यांपासून रस्ते योजनांची वस्तुस्थिती आणि अडथळ्यांबाबत माहिती जाणून घेतली. हाय वेच्या कामात अनेक प्रकारच्या अडचणीबाबत मुख्यालय स्तरावर माहिती देण्यात येत होती. परंतु समस्या लालफितशाहीत दाबल्या जात होत्या. राजमार्गासंबंधित १४ जून २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित बैठकीत या योजनांमधील अडचणींचा निपटारा होण्याची शक्यता आहे.कामात येणार गतीज्या महामार्गावर काम सुरू आहे परंतु अनेक ठिकाणी कंत्राटदारांच्या अडेलतट्टु धोरणामुळे प्रभाव पडत आहे, अशा प्रकरणांचा निपटारा करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. नागपूर-ओबेदुल्लागंज (एनएच६९) आणि नागपूर-हैदराबाद मार्गाच्या काही भागात याच प्रकारच्या अडचणी येत आहेत. रिंग रोडवर होईल चर्चाशहराला अवजड वाहनांच्या वाहतुकीपासून सुटका देणाऱ्या रिंग रोडच्या योजनेचे कामही अपूर्ण आहे. सध्या कामठी, कन्हान, मनसर आणि जामपर्यंत जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रिंग रोडचे काम पूर्ण झाले आहे. परंतु भरतवाडा, गोधनीसह इतर भागात ७० किलोमीटरपर्यंत रस्ते तयार झाले नाहीत. यासाठी १० वर्षापूर्वी लोकनिर्माण विभागाने जमिनीचे अधिग्रहण केले आहे. ७० किलोमीटरच्या रिंग रोडच्या कामासाठी १२०० कोटी रुपये खर्च येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत रिंग रोडच्या कामाबद्दल विशेष चर्चा होणार आहे. केंद्रीय भूदल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यासह नागपूरजवळचे महामार्गं व संबंधित योजनांची माहिती मागितली होती. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक एम. चंद्रशेखर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
रस्ते होणार ‘सुपरक्लास’
By admin | Published: June 12, 2014 1:07 AM