लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवरील बंद झालेल्या मद्यविक्रीस प्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने तब्बल पाच तास शाहू सभागृह कुस्तीचा आखाडाच बनले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह धक्काबुक्की, जोरदार घोषणा, राजदंड पळविण्याच्या प्रयत्नामुळे सभागृहात लांच्छनास्पद इतिहास लिहिला गेला. अखेर रस्ते हस्तांतरणाचा वादग्रस्त ठराव सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताने जिंकला. त्यामुळे मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला. ठरावाच्या बाजूने ४७ तर विरोधात ३२ मते पडली. विरोध डावलून ठरावावर मतदान घेण्याचा महापौरांनी आदेश देताच विरोधी सदस्य खवळले. विलास वास्कर यांच्यासह अनेक महापौरांच्या आसनाकडे धावले; तर वास्कर यांनी चक्क राजदंडच हिसकावून पळविण्याचा प्रयत्न केला.
रस्ते हस्तांतर ठरावावरून कोल्हापूर पालिकेत गोंधळ
By admin | Published: June 21, 2017 2:35 AM