शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
2
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
3
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
4
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
5
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
6
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
7
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
8
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
9
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
10
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
11
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
12
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
13
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
14
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
15
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
16
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
17
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
18
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा यांची तब्येत बिघडली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
19
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
20
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन

प्रचारात रंगणार झोपड्यांसह रस्त्यांचे मुद्दे

By admin | Published: January 20, 2017 2:16 AM

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, संभाव्य उमेदवारांसह स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, संभाव्य उमेदवारांसह स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विशेषत: नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करत राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी सुरू केली असून, याचा प्रत्यय महापालिकेच्या के-ईस्ट वॉर्डमध्ये येत आहे. नागरी समस्यांसह झोपड्यांचा पुनर्विकास हा या वॉर्डातील प्रचाराचा मुद्दा असून, यानिमित्ताने प्रतिस्पर्धी उमेदवार राजकीय कुरघोडी करत येथे कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.के-ईस्टचा बऱ्यापैकी भाग हा पश्चिम उपनगरात मोडत आहे. या वॉर्डमध्ये एकूण १५ प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ७२मध्ये इस्माईल युसूफ कॉलेज, नटवर नगर, बांद्रेकरवाडी, लक्ष्मी नगर या परिसरांचा समावेश आहे. येथे नागरी समस्यांचा अभाव असून, रस्त्यांच्या कामांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक ७३मध्ये श्याम नगर, मजास बस डेपो, जोगेश्वरी गुंफा, जनता कॉलनीचा समावेश आहे. या परिसरात प्रामुख्याने रस्ते हा विषय महत्त्वाचा आहे. प्रभाग क्रमांक ७४मध्ये दुर्गा नगर, रूप नगर, गणेश नगर, कमाल अमरोही स्टुडिओ परिसराचा समावेश आहे. येथे नागरी वस्त्यांमधील सेवा-सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रभाग क्रमांक ७५मध्ये सेव्हन हिल हॉस्पिटल, मरोळ बस डेपो, कदमवाडी, मरोळ, विजय नगर या परिसराचा समावेश असून, मरोळ येथील रस्ते कायमच उखडलेले असल्याचे चित्र असते. प्रभाग क्रमांक ७६मध्ये देवल तलाव, सीप्झ, सुभाष नगर, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली गुंफा या परिसराचा समावेश असून, येथे नागरी सुविधांवर लोकप्रतिनिधींनी आणखी भर द्यावा, असे स्थानिकांनी सांगितले.प्रभाग क्रमांक ७७मध्ये इन्कम टॅक्सी कॉलनी, मेघवाडी, इंदिरा नगर, कोकण नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ७८मध्ये वांद्रे प्लॉट, झुला मैदान, शिवाजी नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ७९मध्ये शंकरवाडी, होली स्पिरिट रुग्णालय, तोलानी कॉलेज परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८०मध्ये एम.व्ही. कॉलेज, पारशी कॉलनी, आझाद नगर, बिमा नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८१मध्ये शेर-ए-पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८२मध्ये जे.बी. नगर, अशोक नगर, रामलीला मैदान, साई नगर, ए.ए. आय कॉलनी परिसराचा समावेश आहे. या परिसरात काही ठिकाणी झोपड्या असून, झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची समस्या येथे प्रामुख्याने भेडसावत आहे. झोपडीधारकांच्या पुनर्वसनासह झोपड्यांमध्ये पुरेशा नागरी सेवा देण्याबाबत रहिवासी आक्रमक असून, हा प्रश्न येथे भेडसावत आहे.प्रभाग क्रमांक ८३मध्ये आंबेडकर नगर, बामणपाडा, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनीचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८४मध्ये कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाष नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८५मध्ये डहाणूकर कॉलेज, शास्त्री नगर, विलेपार्ले परिसराचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८६मध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार गाव, चिमटपाड्याचा समावेश आहे. या प्रभागांमधील काही परिसर विकसित असले तरी सहार गाव आणि परिसरात अद्याप नागरी सेवांचा अभावच आहे. एकंदर या वॉर्डमध्ये रस्ते आणि झोपड्या प्रचाराचा मुद्दा असणार असून, यांचे प्रश्न कोण सोडवणार? हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)प्रभाग क्रमांक ८३मध्ये आंबेडकर नगर, बामणपाडा, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनीचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८४मध्ये कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाष नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८५मध्ये डहाणूकर कॉलेज, शास्त्री नगर, विलेपार्ले परिसराचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८६मध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार गाव, चिमटपाड्याचा समावेश आहे.