शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
5
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
6
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
7
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
8
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
9
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
10
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
11
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
12
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
13
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
14
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
15
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
16
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
17
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
18
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
19
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

मुंबईत रस्त्यांच्या कामात घोटाळा

By admin | Published: April 26, 2016 6:37 AM

सरासरी ५३ टक्के अनियमितता असल्याचा गंभीर ठपका महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना सोपवलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईत कोणत्याही रस्त्याचे काम ठरलेल्या मापदंडानुसार झालेले नसून त्यात सरासरी ५३ टक्के अनियमितता असल्याचा गंभीर ठपका महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना सोपवलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई नगरपालिकेत रस्त्यांच्या कामात घोटाळा असल्याची कबुलीच प्रशासनाने दिली आहे. या घोटाळ्यात रस्ते विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र मुरुडकर यांना नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे, तर अशोक पवार आता इमारत देखभाल खात्यात आहेत़मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत़ यापैकी ३४ कामांमध्ये अनियमितता असल्याचा संशय महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केला होता़ त्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी चौकशीचे आदेश दिले होते़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज महापौरांकडे चौकशी अहवाल सादर केला़