पिंपरी : श्रीमंतनगरीत करोडपती असणारी महापालिका आता हेच सत्ताधारी राहिले तर पिंपरी-चिंचवडनगरीतील नागरिक रोडपती व्हायला वेळ लागणार नाही. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि शवदाहिनीतही भ्रष्टाचार केला. या सत्ताधाऱ्यांनी स्मशानघाटही सोडला नाही. त्यांना विजेचा झटका द्यायला हवा. स्पेशल आॅडिट करून या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यांना आपली जागा दाखवू, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपाच्या प्रचाराचा प्रारंभ चिंचवड येथील मोरया गोसावी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. या वेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, संजय काकडे, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी खासदार गजानन बाबर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘मी १९९२ मध्ये नगरसेवक झालो. त्या वेळी अण्णासाहेब मगर यांनी विकसित केलेली श्रीमंतनगरी असा लौकिक आता खाली येऊ लागला आहे.’’ (प्रतिनिधी)अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवू१अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे होत असताना प्रशासनाने थांबविली नाहीत. बिल्डरांनीही विनापरवाना बांधकामे केली आणि निघून गेले. गरिबांना संरक्षण देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याचबरोबर ज्या व्यावसायिकांनी बांधकामे केली त्यांना शासन व्हायला हवे. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारची बांधकामे होणार नाही, याबाबतही तरतूद केली आहे. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना जेलमध्ये पाठविले जाईल.’’२शास्तीचा आदेश खोटा असल्याची शिवसेनेची टीका चुकीची आहे. आदेश संकेतस्थळावर टाकायला विलंब झाला. मतांकरिता किती आंधळे आहोत, हे दिसून येते. शहरात मेडिकल कॉलेज करणार. पोलीस आयुक्तालय सुरू करणार आहे.३एचए पुनर्वसनासाठी शंभर कोटी सरकारने दिले आहेत. एकत्रित प्रस्तावामुळे स्मार्ट सिटीत सुरुवातीला शहराचा समावेश नव्हता. नंतर तो केला आहे. शहरातील सार्वजनिक सुविधा स्मार्ट करणार. पीएमपीएलचे मजबुतीकरण करणार आहे.
करोडपती महापालिका ‘राष्ट्रवादी’मुळे रोडपती
By admin | Published: February 10, 2017 3:14 AM