कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेतील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. क्रेडीया एमसीएचआय बिल्डर संघटनेशी महापालिका प्रशासनाने सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार एमसीएचआयच्या माध्यमातून २२ रस्त्यावरील दुभाजक आणि ७ वाहतूक बेटे सुशोभित केली जाणार आहेत.
महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करताना एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांच्यासह शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली आदी उपस्थित होते. या दुभाजकांसह वाहतूक बेटांची देखभाल दुरुस्ती आणि त्यांची निगा एमसीएचआय राखणार आहे. महापालिकेच्या विकास आराखडय़ातील वाहतूक बेटे आणि रस्ता दुभाजक यांच्या देखभाल दुरुस्ती आणि निगा राखण्याचा कालावधी पाच वर्षासाठीचा आहे. चौकातील हिरवळीसाठी झाडे लावणो. प्रत्येक रस्ता दुभाजकाला गार्ड स्टोन लावून वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे. वर्षातून दोन वेळा पाण्याणो धुणे, किरकोळ देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बिल्डरांकडे असेल. त्या बदल्यात वाहतूक बेटे आणि रस्ता दुभाजकावर विद्युत खांबावरील जाहिरातीचे हक्क संबंधित बिल्डरला विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहेत. तसेच सामाजिक संदेश व महापालिकेचे जनजागृतीपर संदेश लावणो बिल्डरला बंधनकारक राहणार आहे.
पुना लिंक रोड, सूचकनाका, चक्की नाका, मलंग रोड, साकेत कॉलेज, नेतीवली, मुरबाड वळण रस्ता, प्रेम ऑटो, दुर्गाडी, गांधीर रोड, संतोषी माता रोड, बेतूरकरपाडा रोड, खडकपाडा रोड, बारावे रोड, बिर्ला कॉलेज रोड, निक्की नगर, माधव संकल्प, कोलवली, सत्यम होम्स, शहाड पूल, मोहने रोड, टिटवाळा स्टेशन रोड, काळी मशीद, घरडा सर्कल, मंजूनाथ शाळा, ठाकूर्ली, सावित्रीबाई फुले, आधारवाडी, वायले नगरया परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे.