शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रस्त्यावर मंडपांना परवानगी नाही!

By admin | Published: August 04, 2015 1:50 AM

यंदातरी रत्यावर मंडप उभारण्यास परवानगी द्यावी अशी सातत्याने मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघडणी केली.

मुंबई : यंदातरी रत्यावर मंडप उभारण्यास परवानगी द्यावी अशी सातत्याने मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे वाहतुकीला व पादचाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच उत्सव मंडळांना परवानगी द्यावी, या आदेशाचे पालन केले जाईल, अशी हमी देण्याची नामुश्की महापालिकेवर ओढवली. त्यामुळे यंदा मुंबईतील रस्त्यांवर उत्सव मंडळे आणि त्यांचे मंडप दिसणार नाहीत. गेल्या महिन्यात न्यायालयाने कान पिळल्यानंतर पालिकेने उत्सव मंडळांना मंडपांसाठी परवानगी देणारे धोरण आखले. या धोरणाची प्रत पालिकेने सोमवारी न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सादर केली. वाहतूक व पादचाऱ्यांना मंडपांचा त्रास होत असल्यास त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग दिला जाईल, अशी तरतूद या धोरणात पालिकेने केली आहे. याकडे न्या. ओक यांनी पालिकेचे वकील अनिल साखरे यांचे लक्ष वेधले. ही तरतूद आम्ही दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध असल्याचे ते म्हणाले.वाहतुकीला व पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश आम्ही दिले होते. तरीही पालिकेने रस्त्यावर मंडप उभारण्याचे व त्याने पादचाऱ्यांना आणि वाहतुकीला त्रास झाल्यास पर्यायी मार्गिका देण्याची तयारी दाखवली, हे गैर आहे, असे न्यायालयाने सुनावले.त्यावर तत्काळ न्यायालयात हजर असलेले पालिकेचे उपायुक्त आनंद वागराळकर यांनी खंडपीठाने मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाचे पालन करूनच मंडपांना परवानगी दिली जाईल, अशी हमी अ‍ॅड. साखरे यांच्यामार्फत दिली. खंडपीठाने मार्च महिन्यात वरील आदेश दिले होते. त्यामुळे रस्त्यांवर मंडपांसाठी स्वत:हून प्रयत्न करणाऱ्या पालिकेला चांगलीच चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)