ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.07 - मराठ्यांनी मुकमोर्चे शांततेत, शिस्तीत काढले. मात्र त्याची महागर्जना आमच्या कानीच पोहोचली नाही तर हृदय छेदून गेली. कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षमपणे प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंगोली येथे भाजपतर्फे आयोजित शेतकरी व बचत गट मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दिलीप कांबळे, खा. बंडू जाधव, आ.तुषार राठोड, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मराठा समाजाचे मुकमोर्चे काही राजकीय नाहीत. एवढी विक्रमी मोर्चे काढणे कुणालाही शक्य नाही. हा समाजाचा आक्रोश आहे. आरक्षण देण्याचीच आमची भूमिका आहे. त्यासाठी सक्षम वकील लावले. आतापर्यंत सत्तेत असणाºयांनी कायदेशीर प्रक्रिया न करता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पायाखालची वाळू घसरल्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र आम्ही आरक्षणासाठी कायदा केला. आता सक्षमपणे ही बाजू मांडू. आरक्षणच नव्हे, तर कोपर्डीच्या आक्रोशातही काही मंडळी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना ती सवयच आहे. मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा. आरक्षणात शासकीय संस्थांच्या ६ हजारपैकी ९00 जागाच मराठा मुलांना मिळतील. मात्र १.४५ लाख जागा या खाजगी कॉलेजात भरल्या जातात. तेथे किती मराठ्यांना मोफत प्रवेश मिळाला? असा सवाल त्यांनी केला. मात्र उच्च शिक्षणासाठी आता शासन खर्च करेल, असे ते म्हणाले.
तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ५ लाख जणांना रोजगार संधी उपलब्ध करून देवू. तर सिंचनक्षेत्र वाढीसाठी सरकार नियोजन करीत असून ९५ हजार कोटींचा निधी उभारून विविध प्रकल्प मार्गी लावले जातील, असेही ते म्हणाले. तर जगातील सर्वात मोठा राजा छञपती शिवाजी महाराजांचे स्मारकही तेवढेच मोठे उभारले जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वीज व पाणीप्रश्न सोडला तर शेतकरी कुणाच्याही दारी भीक मागणार नाही. हे दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार काम करीत आहे. ९५ हजार कोटींची कामे करायची आहेत. त्यासाठी नाबार्डकडून ६ टक्के व्याजाने १६८00 कोटी, केंद्राचे १५ हजार कोेटी व उर्वरित राज्य शासन नियमित तरतूद करणार आहे. तर हिंगोलीचा १७00 कोटी रुपयांचा अनुशेष निघत असून तो राज्यपालांच्या मंजुरीनंतर तीन वर्षांत भरून काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या काळातील विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
उच्च शिक्षण, आरोग्यसेवा विनामूल्य करू
फडणवीस म्हणाले, आगामी काळात शेतकरी व गोरगरिबांना १२00 आजारांवर विनामूल्य उपचारासाठी म.फुले जनारोग्य योजना आखली आहे. यासाठी काही उद्योगपती व सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तर सध्या ७५0 स्मार्ट गावे केली असून २0१८ पर्यंत २९ हजार गावांपर्यंत हा लाभ पोहोचवू. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे शहरी शिक्षण व आरोग्य सेवांचा लाभ ग्रामीण भागात मिळेल. एवढेच नव्हे, तर उच्च शिक्षणासाठी शेतकºयांच्या मुलाचा खर्च शासन करेल, असेही ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेत सहा हजार गावे दुष्काळमुक्त झाली. २0१९ पर्यंत २0 हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असेही फडणवीस म्हणाले. कौशल्या विकासात कृषीपूर उद्योगांचे प्रशिक्षण अन् अण्णासाहेब आर्थिक महामंडळामार्फत ५ लाख जणांना कर्जपुरवठा करणार असल्याचेही सांगितले.