दुर्लक्ष : जलवाहिन्यांची गळती होते की पाण्याची चोरी औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे की, पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; परंतु औरंगाबादकरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे.मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी ॲप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून १४५ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. असा होतो पाणीपुरवठाशहराला जायकवाडी आणि हर्सूल तलावातून पाणी येते. दररोज २०० द़ ल़ लिटर पाण्याची गरज असून, १२० ते १२५ द़ ल़ लिटर पाणीपुरवठा ५५ जलकुंभापर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. त्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ गळती आणि चोर्यांमध्ये २० ते ३० द़ ल़ लिटर पाणी जाते़ शहराची पाण्याची गरजप्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. धरणातून रोज १४५ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यातून शहराला १२५ एमएलडी पाणी येते. २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहराची लोकसंख्या १३ लाख असून, दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा ७८ लिटर पाणी दरडोई देते आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १ लाख ५ हजार घरगुती, तर १ हजार ३०० व्यावसायिक नळ कनेक्शन आहेत. चार दिवस लागतीलजायकवाडीला अखंड वीज मिळाली, तर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चार दिवस लागतील. वेळापत्रक महावितरणच्या शटडाऊनमुळे कोलमडले आहे. पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराचे वेळापत्रक कोलमडते. पाण्याची गळती नेहमीप्रमाणेच आहे. त्याचा वेळापत्रकावर परिणाम झालेला नाही. तसेच पाण्याची चोरीदेखील होत नसल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.
शहराच्या २० एमएलडी पाण्यावर दरोडा
By admin | Published: May 04, 2014 11:54 PM