शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मालेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

By admin | Published: August 12, 2016 7:37 PM

एकदा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून गुरूवारच्या रात्रीदरम्यान मालेगाव शहरातील तीन ठिकाणी दरोडा टाकून रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 12-  मंगळवारच्या रात्री टाकलेल्या दरोडा घटनेची शाई वाळत नाही; तोच पुन्हा एकदा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून गुरूवारच्या रात्रीदरम्यान मालेगाव शहरातील तीन ठिकाणी दरोडा टाकून रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. नागरदास रोडवरील साईनगरातील प्रदीप भवनसिंग जोहरे व शे. असीफ शे. ईसुफ यांच्या घरी तसेच संदीप सोळंके यांच्या दुकानात दरोडेखोरांनी धूमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.मालेगाव नागरदास मार्गावर असलेल्या साईनगरमधे राहत असलेले जोहरे यांच्या घरी गुरुवारच्या रात्री १२ ते १२:३० वाजतादरम्यान खिडकीचे काच फोडण्याचा आवाज आला. खिडकीतुन बाहेर पाहिले असता, बाहेर ५ ते ७ जण दिसून आले. जोहरे यांनी शेजारी असलेल्या श्रीराम सिताराम भुजाडे यांना फोन करुन बोलाविले. दरम्यान भुजाडे आल्याचे समजून जोहरे यांनी घराचा दरवाजा उघडताच, दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. जोहरे यांच्या गळ्याला कोयता लावून व घरातील लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील रोख अडीच लाख रुपये व ३२ तोळे सोन्या-चांदीचे दागीने व घरातील नविन साड्या असा ऐवज लंपास केला.एवढ्यात शेजारी असलेले भुजाडे तेथे आले असता त्यांनादेखील लोखंडी पाईपने मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर गांधीनगरातील शे. असीफ शे. ईसुफ यांच्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. महिलांच्या गळ्यातील पोथ व कानातले दागीने हिसकावून घेतले. तिसरी घटना नागरतास रोडवरील जगदंबा वेल्डिंग वर्क येथे घडली. येथील संदीप सोळंके यांना मारहाण करून रोख रक्कम लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे व ठाणेदाराने घटनेची माहिती जाणून घेतली. १२ आॅगस्ट रोजी घटनास्थळी बोटाचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते. मात्र, कोणताही सुगावा लागला नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी एक चाकू आढळून आला. प्रदीप भवनसिग जोहरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोराविरूद्ध भादंवी कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला.