शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

शेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

By admin | Published: January 01, 2017 1:41 AM

महिलेस मारहाण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

शेगाव, दि. ३१- पहाटे ३ ते ४.३0 वाजताच्या सुमारास शहरात व्यंकटेश नगरात दोन ठिकाणी व जगदंबा नगरात एका ठिकाणी दरोडा पडल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी एका महिलेस मारहाण केली असून लाखोचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकाच परिसरात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे शहर सुरक्षिततेबाबत जनतेमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अकोला येथून श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचे निरीक्षण करवून घेतले आहे. पहाटे ३ ते ४.३0 वाजताच्या सुमारास पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील प्राथमिक पाहणीनंतर पहिली घटना जगदंबा नगर येथील अँड. अजय तायडे यांच्या घरची दिसत असून अजय तायडे यांच्या घराचे समोरच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून नंतर समोरच्या मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. दरोडेखोरांना घरात काहीही मिळून न आल्याने त्यांनी या घरातून वकिली व्यवसायाच्या संबंधित कागदपत्रांची बॅग पळवली व त्यातील कागदपत्रे जवळच काही अंतरावर फेकली व बॅग घेऊन गेले. घटनेच्या वेळी दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेतल्याचे आढळले. ही घटना घडली ते घर अँड. तायडे यांचे कार्यालय असल्यामुळे या घरात दरोडेखोरांना काहीच मिळाले नाही. त्यानंतर दुसरी घटना जगदंबानगर लगतच्या व्यंकटेश नगरातील बबनराव गावंडे यांच्या घरी घडली. गावंडे यांच्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे पाहून दरोडेखोरांनी मागच्या बाजूने खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाट, बॅग व डब्बे उघडल्याचे आढळले. गावंडे हे घरी नसल्यामुळे त्यांच्या घरातून काय चोरीला गेले, ते कळू शकले नाही. पोलिसांनी गावंडे यांच्या घराचे निरीक्षण करून पंचनामा केला आहे. तिसर्‍या घटनेत व्यंकटेश नगरातच गावंडे यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या डॉ. काळमेघ यांच्या घराचे मागच्या बाजूने असलेल्या किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरात झोपलेल्या डॉ. काळमेघ यांच्या पत्नी सूचिता काळमेघ यांना मारहाण करून त्यांच्या व मुलगी स्वाती काळमेघ आणि वृद्ध आईच्या अंगावरील ८0 गॅ्रम सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले व घरातील ३0 हजार रुपये रोख र क्कम घेऊन पोबारा केला. दरोडेखोरांनी लाइट न लावता अंधारात डोळ्यावर बॅटरीचा लाइट चमकवून स्वत:ची ओळख पटू दिली नाही. घटनेच्या वेळी डॉ. काळमेघ हे समोरच्या खोलीत झोपलेले होते. घटनेची माहिती पहाटे ५ वा. काळमेघ यांनी पोलीस ठाण्यात फोनवर दिल्यानंतर रात्रपाळीवर असलेले एपीआय संजय अढाव यांनी लागलीच घटनास्थळ गाठून घटनेची चौकशी सुरू केली.त्यानंतर सकाळी ७ च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर, ठाणेदार यशवंत बाविस्कर, पीएसआय डी.बी. वाघमोडे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेची चौकशी केली. तसेच अकोला येथील श्‍वानपथक व बुलडाणा येथील ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचे निरीक्षण केले. घटनेचा तपास करून लवकरच दरोडेखोरांना गजाआड करू, असा आत्मविश्‍वास यावेळी पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकाच परिसरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांकडून सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात असून पोलिसांनी रात्रीची गस्त डोळ्यात तेल घालून करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.