ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ११ - गणेश विसजर्नाच्यावेळी विसजर्न तलावात एका पोलिस अधिका-याला बुडवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना मोहने परिसरातील यादवनगरात राहणा-या पोलिसावर एका तरुणाने लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या पोलिसाचे नाव उत्तम अडसूळ असे असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसावर हल्ला होऊन देखील हल्ला करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली नसल्याने पोलिसांच्या कुटुंबियानी नाराजी व्यक्त केली आहे. अडसूळ हे ठाणे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. अडसूळ हे मोहने येथील यदवनगरात राहतात. काल शनिवारी रात्री ते कामावर जाण्यापूर्वी त्यांच्या पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी सोबत घेऊन गेले होते.
कुत्र्याला फिरवून आणल्यावर ते कामावर जाणार होते. कुत्र्याला फिरायला घेऊन गेले असता त्यांच्या मागून एक तरुण आला. त्याने लोखंडी सळईने अडसूळ यांच्या डोक्यावर दोन वेळा जारदार प्रहार केला. हा प्रकार पाहून अडसूळ यांच्या पत्नी पुढे आल्या. त्यांना पाहून प्रहार करणा-या तरुणाने पळ काढला. या घटनेत गंभीर दुखापत झालेले अडसूळ यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
अडसूळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा त्यांच्या शेजारीच राहतो. त्याचे नाव सचिन शेडगे असे आहे. सचिनने अडसूळ यांच्यावर हल्ला का केला याचा उलगडा झालेला नाही. तर सचिने असे का केले याची माहिती पोलिसांसमोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी 324 कलमान्वये सचिनच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कर्मचारी अडसूळ यांच्या मते सचिनच्या विरोधात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याकडे विचारणा केली असता पोलिसांनी सांगितले की, ज्या कलमात सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे. त्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश अहेत की, अरोपीला अटक करण्यापूर्वी त्यांना नोटिस दिली जावी. त्याचा जबाब घेतला जावा. त्यानंतर त्याला अटक करण्यात यावी.
ही प्रक्रिया झाल्यावर सचिनला अटक करण्यात येईल. सचिनला नोटिस दिली आहे. सचिन अनेकांशी भांडतच असतो अशी माहिती त्या परिसरातील नागरीकांकडून सांगण्यात येत अहे. राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनाचा आकडा 998 इतका आहे. ठाणो जिल्ह्यातील पोलिसांवरझालेल्या हल्ल्याचा आकडा हा 10 इतका आहे.