महाड : कोकण रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या रेल्वे मार्गावर आठ नवी स्थानके बांधण्यात येत आहेत. सापे वामनेसारख्या फ्लॅग स्टेशन्सचे रूपांतर स्थानकांमध्ये करण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी वीर येथे बुधवारी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावरील रायगड जिल्ह्यातील स्थानकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गुप्ता आज वीर रेल्वे स्थानकात आले होते. त्या वेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोकण मार्गावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ होणार आहे, तसेच रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण जून ते डिसेंबर २०१९ पर्यंत तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, तर गोरेगाव आणि इंदापूर स्थानकांचे काम प्रगतिपथावर आहे, असे ते म्हणाले. या भेटीमध्ये त्यांनी रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्याचे निराकरण करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण डिसेंबर १९ पर्यंत पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 6:59 AM