कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकली आहेत. कायमच समाजभान जपत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या या नेत्याने आपले वेगळेपण जपले आहे. यातच आता आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते धनगर समाज बांधवांसोबत ढोल वाजवताना आणि पारंपरिक गजे नृत्य करताना दिसून येत आहेत.
आमदार रोहित पवार यांची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती'त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल कर्जतमधील धनगर समाज बांधवांनी पारंपरिक गजे नृत्य करत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत ढोल वाजवण्याचा आणि गजे नृत्यात सहभागी होण्याचा मोह आमदार रोहित पवार यांना आवरला नाही. त्यांनी धनगर समाज बांधवांसोबत ढोल वाजवला आणि पारंपरिक गजे नृत्य केले.
दरम्यान, याआधीही आमदार रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरला भेट दिली होती आणि येथील रुग्णांची आपलेपणाने चौकशी केली होती. इतकंच नव्हे, तर तिथे असणाऱ्या अबालवृद्धांसोबत त्यांनी चक्क मराठी चित्रपटातील गाण्यावर ठेकाही धरला होता. कर्जत येथील कोव्हिड सेंटरला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी तेथील कोरोना रुग्णांसोबत 'झिंगाट' गाण्यावर नृत्य करण्याचाही आनंद घेतला. आमदार रोहित पवारांच्या या डान्सची चर्चा कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती.