मुंबई : प्रेमाचा गुलाबी दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या 'व्हॅलेनटाईन डे' ( 14 फेब्रुवारी ) दिवशी साजरा केला जातो. याच दिवशी कित्येक जण आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते व्यक्त करतात. तर अनेकजण आपल्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना 'व्हॅलेनटाईन डे'च्या शुभेच्छा सुद्धा देतात. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या रोहित पवारांनी सुद्धा ट्वीटरवरून 'व्हॅलेनटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधला.
रोहित पवार यांनी ट्वीटरवरून 'व्हॅलेनटाईन डे'च्या शुभेच्छा देत म्हंटले आहे की, आजचा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. तर आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या, गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.
इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. यावरूनच रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.