मुंबई : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलंय. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 5 दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी महाविकास आघाडी सरकारने मान्य केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. तर या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा आपले मत मांडले आहे.
रोहित पवार म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र पोलिसांनाही त्यांच्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी पोलीस भरती करुन त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा किंवा त्यांना अतिरिक्त कामाचा भत्ता देण्याचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर ठाकरे सरकराने घेतलेल्या या निर्णयातून अत्यावश्यक सेवांसह विविध महत्त्वाच्या खात्यातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलंय. तरीही, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे, त्यांना मोठा दिलासा देणारी ही बातमी असून त्यांचा विकेंड मजेत जाणार आहे.