मुंबई : लोकांनी बैलाचे मांस खाऊ नये, ही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवली आहे.महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी सरकारची बाजू स्पष्ट केल्यानंतर न्या. अभय ओक व न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे म्हटले.या कायद्यामागे कोणते मोठे जनहीत आहे? अशीही विचारणा खंडपीठाने सरकारकडे करताच सरकारने गायींचे प्रमाण अत्यंत कमी होत चालल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणले.
‘बैलाचे मांस खाऊ नये सरकारची भूमिका स्पष्ट’
By admin | Published: December 19, 2015 2:02 AM