शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

वाघोलीच्या शनिमंदिरात प्रसाद म्हणून मिळते रोप

By admin | Published: August 06, 2016 2:51 AM

एरव्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो की, साखर फुटाणे किंवा खोबऱ्याचा प्रसाद नित्याचा असतो.

वाघोली/वसई : एरव्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो की, साखर फुटाणे किंवा खोबऱ्याचा प्रसाद नित्याचा असतो. मात्र, त्या जागी तुम्हाला कुणी ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत हातावर झाडाचे रोप ठेवले तर कसं वाटेल. चकित झालात ना? पण असा अभिनव प्रयोग तालुक्यातील वाघोली येथील शनिमंदिरात सुरु असून दर शनिवारी येथे भक्तांची रीघ असते.येथील नाईक बंधूंनी फुलारे आळीत हे मंदिर बांधले आहे. विशेष म्हणजे या वास्तूची उभारणी अवघ्या ९० दिवसांमध्ये करण्यात आलेली आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रम्य असा आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री शनिदेवांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय रमणीय व प्रसन्न आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी नि:शुल्क ध्यान केंद्रही बनवलेले आहे. ट्रस्टच्या मार्फत गेली काही वर्षे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून फुलझाडेवाटप केली जात असतात. शेतीप्रधान वसई तालुक्यातून हिरवळ नामशेष होत चालली असताना ट्रस्टच्या माध्यमातून एक वेगळी चळवळ उभी केली गेली आहे. नाईक बंधूनी ट्रस्टच्या मार्फत ५ लाखांहून अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप केलेले आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करणारे सौरऊर्जा केंद्र, ५० टक्के सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून देणारी मणीबाई फुलारे ट्रस्ट अशा विविध सामाजिक कार्यातून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, खाद्य - नाट्यसंगीत महोत्सव, एकांकिका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन वर्षभर सुरू असते. एकंदरीत वन डे पिकनिकसाठी हे चांगले ठिकाण आहे. (वार्ताहर)>श्रावणी शनिवारी खवय्यांना मेजवानीश्रावण महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. पौर्णिमेजवळ श्रवण नक्षत्र येत असल्याने प्रत्येक शनिवारी वाघोली शनिमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्थानिक महिलांकडून सामवेदी खाद्यपदार्थही खवय्यांना चाखायला मिळत असतात. पुरणपोळी, आळूवडी, भरलेले मोदक, खरवस, दुधाचे लाडू, शेवई, थालीपीठ, पिठलेभाकर अशा नानाविध प्रकारांसोबत सामवेदी पांगी हा प्रकारही लोकांना खायला मिळतो.>गुडघेदुखीवर मोफत औषध : मंदिराच्या उजव्या बाजूला गोलाकार चौथरा बांधण्यात आलेला आहे. चौथऱ्यावर श्री शनिदेवाची प्रतीकात्मक मूर्ती असून सोबत हनुमंताचीही मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. तेल, श्रीफळ या चौथऱ्यावरच वाहून पूजा केली जाते. भाविक त्यावर तेलाभिषेक करून मगच मुख्य मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेतात. वाहून जाणारे तेल जमा करून त्यात वनौषधी टाकून ते तेल नंतर भाविकांना गुडघेदुखीवर मोफत दिले जाते. दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.