लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल दहा कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. सदर मेट्रोच्या कामासाठी दहा कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. डी.एन. नगर ते मानखुर्द या मेट्रो-२ ब चे काम चार पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे- कासारवडवली या मेट्रो-४ चे काम पाच पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. मेट्रो-२ ब चे एक पॅकेज आणि मेट्रो-४ च्या पाच पॅकेजसाठी लार्सन अॅण्ड टूब्रो तयार आहे. तर मेट्रो-२ ब एक पॅकेज आणि मेट्रो-४ च्या दोन पॅकेजसाठी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने तयारी दाखवली आहे. मेट्रो-२ च्या एका पॅकेजसाठी जेएचईसी-आरसीसी-जेव्ही (चायना) ने तयारी दाखवली आहे. तर मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रत्येकी दोन पॅकेजसाठी एनसीसी व जेएमसीने तयारी दाखवली आहे.मेट्रो-२ ब च्या दोन पॅकेजसह मेट्रो-४ च्या एका पॅकेजसाठी जे. कुमार स्पर्धेत आहे.याव्यतीरिक्त सिम्प्लेक्स, रिलायन्स, आयटीडी, सीएचइसी-टीपीएल या कंपन्याही स्पर्धेत असून, लवकरच या प्रकल्पाच्या पुढील कामासाठीचा निर्णय घेण्यात येणार आहे.मेट्रो-२ च्या एका पॅकेजसाठी जेएचईसी-आरसीसी-जेव्हीने तर मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रत्येकी दोन पॅकेजसाठी एनसीसी व जेएमसीने तयारी दाखवली आहे.मेट्रोलांबी प्रकल्प किंमतमेट्रो-२ ब : डी. एन. नगर-२३.६ १०,९८६ कोटीवांद्रे-मंडालेकि.मी.मेट्रो-४ : वडाळा-घाटकोपर-३२.३१४,५४९ठाणे-कासारवडवलीकि.मी.
मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ साठी रस्सीखेच
By admin | Published: May 14, 2017 1:33 AM