मुंबई : राज्यातील १० महापालिका व २५ जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) यांच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.रिपाइंने केवळ भाजपासोबत युती झाल्यास ६० जागांची मागणी केली आहे. शिवसेना युतीत सामील झाली, तर रिपाइंला किमान ४० जागा हव्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. वॉर्डनिहाय चर्चेनंतरच जागावाटपाचा निर्णय घेणार असल्याचे रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)> कपबशीवर लढणार!रिपाइंच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर लढण्याचा दबाव टाकला जातो. हे प्रकार रोखण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केल्याचे तानसेन ननावरे यांनी सांगितले. ते म्हणाले , रिपाइंचे उमेदवार कपबशी या चिन्हावर निवडणूक लढतील.
रिपाइं-भाजपाची युती जाहीर
By admin | Published: January 19, 2017 5:42 AM