नागपूर : कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवी उमेद जागविली आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आता प्लॅटिना प्रोजेक्ट अंतर्गत प्रत्येक प्लाझ्मा दात्याला २००० रुपये देण्यात येणार आहेत.पूर्वी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती, परंतु प्लाझ्मा दात्यांना प्रवास भाडे, जेवण व त्या दिवशीचा बुडालेल्या रोजगाराचा मोबादला मिळावा म्हणून ही रक्कम देण्याची सुरुवात मेडिकलमधून झाली आहे.वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्टÑ शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणीउपचार प्रकल्प हाती घेतलाआहे.झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने व गंभीर रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाल्याने या प्रकल्पांतर्गत ‘कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा’ची मागणी जोर धरू लागली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आतापर्यंत २० दात्यांनी तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १० दात्यांनी प्लाझ्माचे दान केले आहे.प्लाझ्माची मागणी वाढत चालली आहे. ही संख्या वाढावी, दात्यांना शासकीय रक्तपेढीपर्यंत पोहचण्याचा खर्च त्या दिवशीचा रोजगार बुडाला असेल त्याचा खर्च व जेवणाच्या खर्चाचा मोबदला म्हणून २००० रुपये देणे सुरू झाले आहे.३५० प्लाझ्माबॅग रुग्णांनाराज्यात आतापर्यंत ‘कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा’च्या सुमारे ९०० बॅग उपलब्ध झाल्या. यातील ३५० प्लाझ्मा बॅग रुग्णांना देण्यात आल्या आहेत. प्लाझ्माची मागणी वाढत चालली आहे. त्या तुलनेत फार कमी दाते समोर येत आहेत. प्लाझ्मा दात्यांना त्यांचा खर्चाचा मोबदला म्हणून २००० रुपये देणे सुरू झाले आहे.- डॉ. एम. फैजल, स्टेट नोडल अधिकारी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’
प्लाझ्मा दात्याला २००० रुपये!; ३० दात्यांकडून ‘कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा’चे दान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 2:43 AM