मुंबई : एलिफंटा बेटावरील पर्यटन सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी ३४४ कोटींच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे पर्यटनस्थळ जागतिक दर्जाचे होण्यासाठी साधनसुविधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक मंजुऱ्या तातडीने देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाकडील मंजुऱ्या मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करु , असे त्यांनी सांगितले. एलिफंटा बेट तसेच परिसरात पर्यटन सुविधांची उपलब्धता करण्यासंदर्भात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनात उच्चाधिकार समितीची बैठक झाली. एलिफंटा बेटांवर पर्यटन सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ९२.८७ कोटी रु पयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्याशिवाय खाजगी सार्वजनिक भागीदारीतून पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २५१.५० कोटी रु पये खर्च करण्यात येणार आहेत. एकूण ३४४.३७ कोटींच्या सुविधा विकास आराखड्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले की, सौंदर्यीकरण, निवासाची सुविधा यांमध्ये वाढ करु न हे एक आदर्श पर्यटनस्थळ म्हणून पुढे येईल. (विशेष प्रतिनिधी)
एलिफंटासाठी ३४४ कोटींचा आराखडा
By admin | Published: March 25, 2017 2:11 AM