मुंबई - 'हिरव्या' हातांच्या, चपला-बुटांना 'माती' असलेल्या आणि प्रश्न विचारायला न घाबरणाऱ्या मुलांच्या शाळांचा शोध पूर्ण झाला आहे. 'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन'च्या 'ऊर्जा' या विशेष प्रकल्पाअंतर्गत मुलांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या एकूण १० शाळांना ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. महाराष्ट्र आणि गोव्यातून ४०९ शाळांनी या विशेष योजनेसाठी आपले प्रकल्प/कल्पना पाठवल्या होत्या. नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत असलेल्या 'ऊर्जा'च्या अभियानात या सर्व आणि इतरही शाळांना सामावून घेण्यात येणार आहे.
दहा शाळांना आठ लाख रुपये, 'लोकमत', 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन' आणि 'ऊर्जा'; पुरस्कार विजेते जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 07:24 IST