नीलेश शहाकार, बुलडाणाअनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अर्थसहाय्य देण्याच्या विशेष घटक योजनेंतर्गत २०१५-१६ वर्षाकरिता लाभार्थी शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी १८ लाख रुपयांचा निधी देण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्याचे आदेश २३ जूनला दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी
By admin | Published: June 25, 2015 1:09 AM