पुणे : राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित २५ टक्के जागांसाठी राबविली जाणारी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने डिसेंबर २०१५ मध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाने केलेल्या दिरंगाईमुळे तब्बल चार महिने प्रवेश प्रक्रियेस उशीर झाला. त्यातच शाळांना आरटीईचा शुल्क परतावा न दिल्यामुळे काही शाळांनी प्रवेशासाठी नाव नोंदणी न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस आणखी विलंब झाला. शिक्षण विभागाच्या ६६६.१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्ज भरता येईल. पुणे, धुळे, वर्धा,जळगाव, रायगड, ठाणे, सातारा, वर्धा, नाशिक, मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरू
By admin | Published: April 14, 2016 1:18 AM