शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

आरटीई प्रवेशासाठी बुधवारपासून स्वीकारणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 7:30 PM

शाळांमधील १६ हजार ५१ जागांवर प्रवेश दिले जाणार

ठळक मुद्देयेत्या मंगळवारपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता मार्च महिन्यात प्रवेशाची सोडत काढली जाईलपुण्यातील सर्वाधिक ९२१ शाळांनी नोंदणी केली

पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)२५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ११३ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमधील १ लाख १२ हजार ९५७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी येत्या बुधवारपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. तर मार्च महिन्यात प्रवेशाची सोडत काढली जाईल,असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रकिया राबविली जात असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळांची नोंदणी सुरू आहे. त्यानुसार पुण्यातील सर्वाधिक ९२१ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमधील १६ हजार ५१ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यात आणखी काही शाळांची वाढ होण्याची शक्यता आहे.पुण्यापाठोपाठ ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरात आटीई प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. राज्य शासनाकडून शाळांना शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करण्यास नकार दिल्याचे दिसून आले आहे.परंतु,सर्व शाळांनी आरटीईमध्ये सहभागी व्हावे,यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.------------आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची जिल्हानिहाय माहिती :- यवतमाळ २०० , वाशिम ९९, वर्धा १२२ , ठाणे ६६८ , सोलापूर ३२९, सिंधूदूर्ग ५१ , सातारा २३६ , सांगली २२६ , रत्नागिरी ९० , रायगड २६२, पुणे ९२१ , परभणी १४७ , पालघर २६९,  उस्मानाबाद १३१, नाशिक ४४६, नंदुरबार ४४, नांदेड २३१ , नागपूर ६७३ , मुंबई २९२, लातूर २३५, कोल्हापूर ३४० , जालना २५३  , जळगाव २८६ , हिंगोली ६९, गोंदिया १४१,  गडचिरोली ६१, धुळे १०३, चंद्रपूर १९७, बुलढाणा ९३, बीड २२०, भंडारा ९३, औरंगाबाद ५४४, अमरावती २४०,अकोला २००, अहमदनगर ३९३,  --------------------------- शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी शाळांचे नोंदणीचे काम सुरू असून बुधवारपासून पालकांना आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच दिलेल्या मुदतीत प्राप्त होणा-या अर्जांचा विचार करून प्रवेशासाठी राज्यात एकच सोडत काढली जाणार आहे.  दिनकर टेमकर ,सह संचालक ,प्राथमिक शिक्षण, महाराष्ट राज्य  

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीGovernmentसरकार