नागपूर /मुंबई : राज्यात शुक्रवारी रात्री एकाचवेळी विविध ठिकाणी ३,०६२ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली असून २१३ बसेस ताब्यात घेण्यात आल्या. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेसाठी राज्यातील ५० आरटीओ कार्यालयातील ६२३ कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. सर्वाधिक ठाणे विभागात ५३९ बसवर कारवाई झाली असून, ३२ बस जप्त करण्यात आल्या. मुंबईत एकूण २२३ बसवर कारवाई करण्यात आली असून, ९ बस जप्त करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाची धास्ती कमी होताच, खासगी बसेसची रहदारीही वाढली. यामुळे खासगी बसेसच्या समस्यांचा पाढा वाचला जात होता. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या खासगी बसेस विशेष तपासणी मोहिमेत परिवहन आयुक्त कार्यालयासह १५ प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा सहभाग होता. जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा असा ‘ड्राईव्ह’ हाती घेण्यात येईल.- डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त अशी झाली कारवाईकार्यालय कारवाई ताब्यात बसेस मुंबई/पनवेल ४९० १७ठाणे ५३९ ३२ पुणे ४७२ ४३ कोल्हापूर ३०१ १७ लातूर १६३ २५ नांदेड ७० १० अमरावती २१६ २५ नाशिक १३८ १२ धुळे २०९ ७औरंगाबाद १४२ १५ नागपूर जिल्हा ३३१ १०‘या’ अनियमिततांची झाली तपासणीतपासणीत विनापरवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदींची तपासणी, वाहनांमधील बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर व जादा भाडे आकारणे आदींची तपासणी करण्यात आली.
रात्रभरात ३,०६२ बस गाड्यांवर आरटीओची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 4:14 AM