शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

रुबाबदार कोल्हापुरी चप्पलला घरघर !

By admin | Published: October 22, 2016 11:58 PM

देशभरातील बाजारपेठेवर वेगळी छाप टाकणाऱ्या, तसेच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ‘कोल्हापुरी चप्पल’च्या व्यवसायाला सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

- भारत चव्हाण, कोल्हापूरदेशभरातील बाजारपेठेवर वेगळी छाप टाकणाऱ्या, तसेच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ‘कोल्हापुरी चप्पल’च्या व्यवसायाला सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारकडून पूर्ण दुर्लक्ष झाल्याने किमान पायाभूत सुविधा मिळत नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. तीव्र स्पर्धेच्या काळात कसाबसा तग धरून राहिलेल्या कारगीरांची अवस्थाही ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाल्याचे दिसून येते. एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणून देशी उत्पादनांना चालना देण्याची घोषणा राज्य सरकार करीत असले, तरी ‘कोल्हापुरी’कडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, चामड्याचे वाढलेले दर, भांडवलासह प्रशिक्षणाचा अभाव, कारागिरांची रोडावत चाललेली संख्या, सरकारचे दुर्लक्ष आदी विविध कारणांनी हा व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे. सरकारी धोरणेही ‘कोल्हापुरी’च्या अडचणीत भर टाकणारी असल्याचा आरोप आहे. कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात चामडी कमावण्याचे सहा कारखाने होते, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जाचक अटींमुळे ते बंद पडले. त्यामुळे कच्चा माल मिळविण्यासाठी कारागिरांना वणवण करावी लागत आहे.संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत सध्या व्यावसायिक व कारागिरांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे येथील निर्यातदार व्यावसायिकांकडून दोन हजार, तीन हजार, चार हजार चप्पल जोडांची मागणी होते, परंतु भांडवलाअभावी ती पूर्ण करणे येथील कारागिरांना अशक्य होते. ‘दात असूनही खाता येत नसल्या’सारखी आमची अवस्था असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे. सध्या कोल्हापुरातील कारागिरांना चेन्नईसह मिरज, अथणी, मदभावी, जत आदी परिसरातून चामड्याची मागणी करावी लागते, परंतु ही चामडी हलक्या दर्जाची आणि महाग आहे. त्यामुळे चप्पल बनविणे मध्यमवर्गीय कारागिरांना अडचणीचे झाले आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत मुंबईत झालेल्या प्रदर्शनात राज्य सरकारने ‘कोल्हापुरी’ची सर्व माहिती घेतली, पण व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्याच्या अनुषंगाने आजअखेर काहीही उपाययोजना झालेली नाही. कोल्हापुरी चप्पलची क्लस्टर योजनाही अद्याप धूळ खात पडलेली आहे. चर्मोद्योग महामंडळाचा कारभार बेभरवशी!राज्य सरकारने चाळीस वर्षांपूर्वी चर्मोद्योग व्यावसायिकांच्या कल्याणासाठी संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाची स्थापना केली. कारागिरांना प्रशिक्षण देणे, त्यांना भांडवलाचा पुरवठा करणे, कच्च्या मालाचा पुरवठा करणे, बाजारपेठ मिळवून देणे आदी हेतू डोळ्यांसमोर ठेवून हे महामंडळ स्थापन झाले, परंतु त्याचा गेल्या काही वर्षांतील कारभार विशिष्ट लोकांना डोळ्यांसमोर ठेवूनच केला गेल्याच्या तक्रारी आहेत. सध्या या महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात दोन कर्मचारी आणि १० अधिकारी आहेत, यावरूनच त्याचा सावळागोंधळ लक्षात येऊ शकतो.‘कोल्हापुरी’चे वैशिष्ट्यआकर्षक बांधणी, सुंदर डिझाइन आणि वजनाने हलकी, ही कोल्हापुरी चप्पलची वैशिष्ट्ये आहेत, तसेच रुबाब वाढवणारी ही देखणी चप्पल आरोग्यासाठीही लाभदायी आहे. ती वापरल्याने शरीरातील सर्व उष्णता शोषून घेतली जाते. डोळ्यांची जळजळ, तसेच तळव्यांची रखरख कमी होऊन थंडावा निर्माण होतो.तामिळनाडू सरकारने चर्मोद्योगाला प्रोत्साहन म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली आहे. पाणी शुद्धिकरणाच्या प्रकल्पासह पायाभूत सुविधा दिल्या आहेत. कर्नाटक सरकारने ‘लेदर इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून कारागिरांना प्रशिक्षण दिले जाते. बाजारपेठेत कोणती वस्तू चालते, याची माहिती दिली जाते. नवीन मशिनरी घेण्याकरिता कर्जे दिली जातात. आम्ही मात्र, भांडवलाअभावी गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने चप्पल बनवित आहोत. सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. - प्रसाद शेटे, इंजिनीअर