शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

चालकांकडून नियमांची पायमल्ली

By admin | Published: April 07, 2017 2:27 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वी येथील उड्डाणपुलाजवळ खासगी वाहन चालकांकडून अनधिकृत बस थांबा तयार करण्यात आला

पनवेल : कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वी येथील उड्डाणपुलाजवळ खासगी वाहन चालकांकडून अनधिकृत बस थांबा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांकडून वारंवार समज देऊन, तसेच दंडात्मक कारवाई करून देखील याठिकाणी मोठ्या संख्येने खासगी वाहने थांबविली जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे . पनवेलसह मुंबईकडून येणारी वाहने पुण्याच्या दिशेने जाणारी अनेक खासगी वाहने थांबवली जातात. अनेक वेळा बसची वाट बघण्यापेक्षा प्रवासीही खासगी वाहनांना थांबवून प्रवास करतात. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाजवळ थांबू नये म्हणून कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने मोठा फलक देखील लावण्यात आला आहे. तरी देखील त्याला न जुमानता खासगी वाहन चालक याठिकाणी थांबून जणू पोलिसांनाच आव्हान देत असतात. दररोज अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून देखील याठिकाणी थांबणाऱ्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे घातक आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या दिशेने येणारी वाहने ही अतिशय तीव्र वेगाने पुढे जात असतात. याठिकाणी कोणताही थांबा नसल्याने वाहन चालक सुसाट याठिकाणाहून वाहन चालवत असतात. त्यामुळे थांबलेली वाहने, प्रवासी यांचा अंदाज न लागल्याने अनेक वेळा ही वाहने याठिकाणच्या गाड्यांना धडकल्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत. कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांच्या मते आम्ही याठिकाणी दररोज एक वाहतूक पोलीस याठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांना सूचना देण्यासाठी ठेवला आहे. तरी देखील काही क्षणासाठी जरी वाहतूक पोलीस याठिकाणाहून बाजूला झाल्यास अनेक जण वाहतूक नियम मोडत असताना नजरेत पडतात. हे प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुंबईच्या दिशेने येणारी अनेक वाहने लाँग ड्राइव्हसाठी याठिकाणाहून जात असतात. या परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमधून खाद्यपदार्थ घेण्यासाठी देखील अनेक वाहने रस्त्यावर सर्रास थांबतात. त्यामुळे देखील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)स्वस्तात प्रवासासाठी जीव धोक्यातपुण्याच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने या मार्गावरून जात असतात. या वाहनात प्रवास करण्यासाठी बस किंवा व्होल्वोच्या दृष्टीने कमी पैसे खर्च होतात. त्यामुळे अनेक प्रवासी आपला जीव मुठीत धरून या अनधिकृत बस थांब्यावर थांबून या वाहनांना थांबवत असतात. या गाड्यांवरील वाहन चालक देखील थोडेफार पैसे मिळविण्यासाठी आपल्या गाड्या थांबवून याठिकाणाहून प्रवासी वाहतूक करीत असतात. अनेक वेळा या खासगी वाहनातून प्रवाशांचे अपहरण देखील करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज एक वाहतूक पोलीस याठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांना सूचना देण्यासाठी ठेवला आहे. तरी देखील काही क्षणासाठी जरी वाहतूक पोलीस याठिकाणाहून बाजूला झाल्यास अनेक जण वाहतूक नियम मोडत असताना नजरेत पडतात. हे प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. - गोरख पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा