शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

एसटी रूपडे पालटणार

By admin | Published: July 17, 2016 12:27 AM

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेली एसटी ही सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ समजली जाते. मात्र अशा या ‘जीवनवाहिनी’ला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे.

 - सुशांत मोरेशहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेली एसटी ही सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ समजली जाते. मात्र अशा या ‘जीवनवाहिनी’ला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. बसेसची झालेली दुरवस्था, त्याचबरोबर स्थानक आणि आगारांमधील अस्वच्छता, वाढलेले ‘वडाप’चे वर्चस्व आणि त्यामुळे कमी होत असलेले प्रवासी व उत्पन्न पाहता एसटीत सुधारणा होणार कधी, असा प्रश्न पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून काही नियोजन करण्यात आले असून, त्यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्याशी केलेली बातचीत...एसटी महामंडळ आता जवळपास दोन हजार कोटींचा तोटा सहन करत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का?तोटा कमी करण्यासाठी आमच्याकडून पुरेपूर प्रयत्न होत आहेत. इंधन खर्च कमी कसा करता येईल; त्याचबरोबर प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करून तसे नियोजनही करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या मार्गांवरील सेवांवर लक्ष केंद्रित करतानाच शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील स्थानिक पातळीवर जास्तीतजास्त कशी सेवा देता येईल याचा विचार करून तशी यंत्रणा राबविली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुविधा आणि स्वच्छता असल्यास प्रवासी आकर्षित होतील हे जाणून आम्ही त्यादृष्टीने पाऊल उचलत आहोत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसमध्ये वायफाय सुविधाही उपलब्ध करून त्याद्वारे स्मार्ट फोनवर प्रवाशांना गाणी, चित्रपट कसे पाहता येतील यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. या वर्षात सर्व बसमध्ये १०० टक्के अशा प्रकारची सुविधा दिली जाणार आहे.

महामंडळाची अनेक बस स्थानके, आगार आणि बसमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसतो? सर्व आगार आणि बस स्थानकांमध्ये असलेली अस्वच्छता ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आगार आणि स्थानके स्वच्छ राहावीत यासाठी आम्ही ‘आउटसोर्सिंग’ करणार आहोत. खाजगी कंपन्यांद्वारे स्वच्छतेचे काम केले जाईल. या कामाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. बस स्थानके, टॉयलेट तसेच चालक व वाहकांचे रेस्ट रूम कसे स्वच्छ राहतील यावर भर देऊ. आउटसोर्सिंग करून ही प्रक्रिया राबविण्यासाठी साधारपणे पाच महिन्यांचा कालावधी लागेल. यामुळे एसटीचा कायापालट नक्की होईल. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता ठेवण्यासाठी एसटी अधिकाऱ्यांनाही काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. यात टॉयलेटबाबतीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टॉयलेटची दुरवस्था असेल किंवा अस्वच्छ असतील तर ते त्वरित दुरुस्त किंवा स्वच्छ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. चालक आणि वाहकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांना प्रशिक्षण देतानाच स्वच्छता कशी राखता येईल याची माहिती दिली जाते.

एसटीचे अपघात कमी कसे होतील? यासाठी काही नियोजन करण्यात आले आहे का?अपघात हा कळीचा मुद्दा असून, ते कमी कसे करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या 0.१५ प्रत्येक लाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण आहे आणि मागील वर्षाशी तुलना केल्यास ते कमी आहे. अपघातांत बसेसचे नुकसान कमी व्हावे आणि प्रवाशांनाही इजा पोहोचू नये किंवा त्याचे प्रमाण फार कमी असावे याकडेही आम्ही विशेष लक्ष देत असून, त्यासाठी एसटी बसचे डिझाईनही बदलण्यात येत आहे. एसटी बसची बॉडी ही स्टीलची केली जाणार असून, त्यांची उंचीही वाढविण्यात येणार आहे आणि त्यावर काम सध्या सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एसटीच्या चालकांकडून अपघात होऊ नये यासाठी प्रशिक्षित असे चालकच आम्ही घेतो. चालकांची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते आणि ही टेस्ट खूप कठीण असते. त्यात पास झाल्यावरच त्यांना घेतले जाते. या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होण्याचे प्रमाण हे ३0 टक्के आहे. त्यामुळे एसटीच्या चालकांकडून सहसा अपघात होत नाहीत.

गेल्या चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. ही संख्या कशी वाढवणार?आमच्या दृष्टीने प्रवासी हे महत्त्वाचेच आहेत आणि त्यांना जास्तीतजास्त आणि चांगल्या सुविधा कशा दिल्या जातील यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसची स्थिती बदलण्याबरोबरच उत्तम सुविधा, सुरक्षा, वेळेवर बस सोडणे, स्थानक आणि आगारांत चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आम्ही काही नियोजनही केले आहे; आणि त्याची अंमलबजावणीही त्वरित केली जाईल. आम्ही बस स्थानकांचे डिझाईन बदलणार असून, त्यासाठी आर्किटेक्टचीही नियुक्ती केली जात आहे. तसेच १३ ठिकाणी बस पोर्ट उभारले जाणार आहेत. यातून प्रवाशांना सुविधा देतानाच उत्पन्नही कसे मिळवता येईल याचे नियोजन आम्ही केले आहे. आता २४ बस स्थानकांचे काम दिले असून, तीन वर्षांत आणखी काही बस स्थानकांचा आर्किटेक्टमार्फत कायापालट केला जाईल. तसेच स्थानकांतील प्रवाशांच्या सोयीसाठी एन्ट्री-एक्झिट बदलणे, टॉयलेटची चांगली सुविधा, कॅन्टीनमध्येही सुधारणा केली जाणार आहे.

‘वडाप’मुळे एसटी महामंडळाचे किती उत्पन्न बुडत आहे? त्याला कसा आळा बसेल?एक सर्वेक्षण झाले होते. त्या सर्वेक्षणानुसार वडापवाल्यांना दररोज १६ ते १७ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. मात्र त्यांची संख्या सांगणे कठीण आहे. वडापमुळे एसटीचे नुकसान होत आहे ही बाब खरी आहे. ते नुकसान होऊ नये यासाठी ग्रामीण भागात अधिकाधिक सेवा दिली जाईल. काही ठिकाणी मिडी बस सुरू करण्याचे नियोजन आहे. एसटीची सेवा सुधारली तर नक्कीच आम्ही वडापवर मात करू आणि ही सेवा सुधारतही आहे. एखादा अपघात झाल्यास एसटीकडून अपघातग्रस्त प्रवाशाला किंवा त्याच्या नातेवाइकाला नुकसानभरपाई दिली जाते. मात्र वडापमधून प्रवास करणाऱ्यांचा अपघात झाल्यास नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण होतो. आमच्याकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे.एसटी महामंडळाने बीओटी तत्त्वावर ३५ बस स्थानकांचा विकास करण्याचे नियोजन केले असून, यातील बहुतांश स्थानकांचा विकासही करण्यात आला आहे. आता बस पोर्ट आणि काही स्थानकांचा आर्किटेक्टमार्फत विकास करणार आहोत. यातून एकच उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे ते म्हणजे प्रवाशांना चांगली सुविधा देणे आणि अधिकाधिक उत्पन्न मिळविणे.

डबल डेकर बसचा प्रयोग यशस्वी होईल का?एसटीत सध्या डबल डेकर बस नाही आणि ही बस एसटीच्या ताफ्यात आणून प्रवाशांसाठी चालवणे अशी कल्पना खूप चांगली आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि एकाच मार्गावर अनेक फेऱ्या चालवून होणारा जास्त खर्चही टाळता येईल. मुंबईतील बेस्ट प्रशासनाची डबल डेकर बस घेऊन मुंबई-पुणे मार्गावर त्याची चाचणी करण्याचा विचार होता. मात्र बेस्टची बस वजनदार आणि उंचीणेही जास्त असल्याने त्या बसला घेऊन करण्यात येणारी चाचणी आम्ही नाकारली. परदेशी कंपन्याकडे डबल डेकर बस असून, त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. यात स्कॅनिया, व्होल्वो इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.

एसटीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी तुटवडा आहे. कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कसा कमी कराल?एसटीत सव्वा लाख कर्मचारी काम करीत आहेत. प्रत्येक वर्षी अनेक कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यामुळे जागा रिक्त होतात. त्या जागा आम्ही भरतोच. प्रामुख्याने कामाचा ताण पडतो तो चालक व वाहकांवर. त्यामुळे त्यांच्या जास्तीतजास्त जागा भरून ताण कसा कमी करता येईल, याचा प्रयत्न करीत आहोत. येत्या काही महिन्यांत सहा हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार असून, यामध्ये चालक व वाहकांचा समावेश असेल.

अधिकृत थांबा नसतानाही एसटी बस हॉटेलवर थांबा देतात. त्यामुळे प्रवाशांची लूट होते. ही लूट कशी थांबेल?एसटी महामंडळाकडून आणखी काही थांब्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात त्यांच्याकडून योग्य सुविधा दिल्या जातील का, त्यांचे दर कसे आहेत, प्रवाशांची लूट तर होणार नाहीना याची माहिती घेतली जात आहे. त्या सर्वेक्षणानंतरच ते थांबे अधिकृत करू. जर एखाद्या चालक आणि वाहकाकडून अनधिकृत थांबा देण्यात आला तर त्यांच्यावर आमच्याकडून कठोर कारवाई केली जाते.

एसटीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेतन सुधारणा समिती स्थापन केली आहे. त्यामुळे काय बदल होईल?वेतन सुधारणा समितीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. यामुळे वेतन सुधारणा तर होईल शिवाय कर्मचाऱ्यांत एकसमानता येईल. कामाप्रमाणे वेतन कसे देता येईल हे वेतन सुधारणा समितीतून पुढे येईल. साधारपणे येत्या तीन महिन्यांत त्याचा अहवाल सादर होईल. एसटीचा कर्मचारी व कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि तोच या एसटीचा कणा आहे.