मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपते घेण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारला याचा फटका बसू लागला असून अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाचा धोका उद्भवू लागला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याची माहिती ट्विटवर दिली आहे. ''माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.'', असे आवाहन त्यांनी केले आहे. कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
प्ले स्टोअरवरून गायब झालेल्या Paytm मधील आपल्या पैशांचं काय?... कंपनीनं केली महत्त्वाची घोषणा
विधानसभा अधिवेशनाआधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस विदर्भात पूरपरिस्थितीचा आढावा आणि विविध कामांसंबंधी दौरे केले. यादरम्यान कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. यानंतर विधानसभा अधिवेशन घेण्यात आले. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडले.
...नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार: छत्रपती उदयनराजे
राज्यातील मंत्री, नेत्यांना कोरोनाचा लागणआतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर खासदार नवनीत राणा कौर आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.