शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

ग्रामीण महाराष्ट्रानेही काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले..!

By admin | Published: February 24, 2017 4:12 AM

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारण कायम सहकार चळवळी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जोरावर

अतुल कुलकर्णी / मुंबईकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारण कायम सहकार चळवळी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जोरावर चालत आले. त्याच ‘व्होट बँके’ला जबरदस्त धक्का देत शहरी तोंडवळ्याच्या भाजपाने ग्रामीण भागात वाजत गाजत प्रवेश केला हे या मिनी विधानसभा निवडणुकीचे मोठे फलित ठरले आहे. ग्रामीण भागात मुसंडी मारत भाजपाने सहा जिल्हा परिषदा आणि आठ जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये आपला प्रवेश स्वबळावर निश्चित केला आहे. दोन्ही काँग्रेसच्या नाराज नेत्यांना भाजपाने स्वत:कडे खेचून घेत हे यश संपादन करत ‘काँग्रेसमुक्त भारत’ या मोदींच्या घोषणेला फडणवीसांनी हातभार लावला आहे त्यामुळे ‘भाजपाच्या चिन्हावर राष्ट्रवादीला बहूमत’ अशी खोचक प्रतिक्रीया या निकालानंतर आली त्यातच सगळे काही आले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या हाणामाऱ्या चव्हाट्यावर आल्या. हेकटपणा करण्यात मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत या दोघांनीही कसर सोडली नाही आणि हा सगळा तमाशा शांतपणे पहात बसण्यात पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश शंभर टक्के यशस्वी झाल्याने मुंबईत काँग्रेसची वाताहात झाली. एवढे सगळे घडून, कोणीही प्रचारात जीव न ओतताही मुंबईत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या कशा याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. निरुपम यांनी आता मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करुन घेतली आहे.प्रदेश काँग्रेसची अवस्थाही दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी झाली. मोहन प्रकाश यांनी पक्षपातळीवर कोणताही समन्वय साधण्याचे काम केले नाही. या निवडणुकीत त्यांनी नेमके केले तरी काय? हा संशोधनाचा विषय आहे. पक्षाकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे अशा तीन तीन माजी मुख्यमंत्र्यांची फौज असूनही कोणातही एकवाक्यता नव्हती. मुंबईच्या भांडणाकडे अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवली आणि निकाल लागताच निरुपमच या पराभवाला दोषी आहेत असे सांगत राणे यांनी स्वत:ची जबाबदारी ढकलून दिली. पृथ्वीराज चव्हाणांनी मुंबईसाठी फक्त एक पत्रकार परिषद घेण्याचे कर्तव्य पार पाडले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातल्या या निवडणुकांसाठी किती सभा घेतल्या हे जाहीरपणे सांगावे. विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी भांडण्यात सगळा वेळ घालवला. प्रत्येकाच्या व्यक्तीगत महत्वाकांक्षा आणि फायद्या तोट्याच्या संकल्पना पक्षाच्या यशापेक्षा मोठ्या झाल्या आणि काँग्रेसला अहमदनगर, नांदेड, सिंधूदूर्ग, अमरावती या पाच जिल्हा परिषदांवर समाधान मानावे लागले. विलासराव देशमुख नसल्याची जाणीव आज अनेकांना झाली ती लातूरात भाजपाचे मंत्री संभाजी निलंगेकर यांनी मारलेल्या मुसंडीमुळे. राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे बडे नेतेही सांगली जिल्हापरिषद वाचवू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ज्या नेत्यांवर विश्वास टाकला त्यांनीच शेवटच्या क्षणी त्यांच्यापासून फारकत घेतली. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची फौज आपापल्या जिल्ह्यात अडकून पडली. सगळ्यात जास्त सभा धनंजय मुंडे यांना घ्याव्या लागल्या यावरुन अजित पवार यांचे राजकारण अजून तरी कोणाच्या पचनी पडलेले नाही हे स्पष्ट झाले. शेवटच्या टप्प्यात शरद पवार यांना या निवडणुकीसाठी मैदानात यावे लागले यावरुन पक्षाची अवस्था किती बिकट झाली हे लक्षात यावे. शिवसेनेने पाठींबा काढला तर सरकार टिकवण्यासाठी भाजपाला पाठींबा देणार नाही, हे मी लिहून देण्यास तयार आहे, असे शरद पवार यांना सांगावे लागले. पवारांच्या शब्दावर आता किती विश्वास उरला आहे याचे हे बोलके उदाहरण ठरावे. परिणामी पुणे, परभणी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर या पाच जिल्हा परिषदांपुरते राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले.दोन्ही काँग्रेस संपवण्यासाठी..!भाजपाचे देशपातळीवरील संघटनमंत्री व्ही. सतीश यांच्याकडे भाजपाच्या काही नेत्यांनी अन्य पक्षातील नेत्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेशावरुन तीव्र आक्षेप घेतले होते.तेव्हा तुम्ही शांत बसा, काँग्रेस मुक्त भारत करायचा असेल तर आधी दोन्ही काँग्रेस संपवाव्या लागतील. त्यामुळे होत असलेल्या प्रवेशांना विरोध करु नका असे सांगून त्यांची रवानगी केली होती. ते वक्तक्य अशा रितीने आता सत्य ठरले आहे..!