शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दारूमुक्तीसाठी ग्रामीण पोलिसांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2017 4:29 PM

हायवेवर असलेले सर्वच बीअर बार बंद झाले. संपूर्ण तालुक्यात केवळ 3 बीअर बार सुरू आहेत

श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 8 - तालुक्यातील हायवेवर असलेले सर्वच बीअर बार बंद झाले. संपूर्ण तालुक्यात केवळ 3 बीअर बार सुरू आहेत. बारवर तोबा गर्दी होत आहे. यामुळे चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू आहे. पण ही अवैध दारू विक्री रोखून सिल्लोड तालुका दारूमुक्त करण्याचा संकल्प सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी केला आहे. यामुळे तळीरामांची पंचायत होताना दिसत आहे. हॉटेल, ढाबे यावर मनसोक्त दारू पिणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांमध्ये घबराट पसरली आहे.सिल्लोड तालुक्यात दारू मुक्तीसाठी ग्रामीण पोलीस धडपड करीत असले तरी तळीराम याला किती प्रतिसाद देतात हे महत्वाचे ठरणार आहे. त्यांनी ठरवले तर हे शक्य आहे. नाही तर ते तळीराम कुठूनही कुणालाही चकवा देऊन चपटी मिळवतातच हे विसरून चालणार नाही. यासाठी सर्वानीच विडा उचलण्याची गरज आहे.  कधी नव्हे हे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. त्यांना मदत करण्याची खरी गरज आहे. समाजाला लागलेली दारू व्यसनाची कीड नष्ट करून दारूमुक्त गाव करून युवकांच्या आयुष्याच्या नवीन सूर्योदय करण्याचा संकल्प सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांनी केला असला तरी जोपर्यंत तळीराम दारू पिणे सोडत नाही तोपर्यंत दारू बंद करणे शक्य नाही. पण पोलिसांची धडपड बघून व्यसनापाई त्रस्त असलेल्या महिलांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पण खरच ही दारू बंद होईल का, गाव दारूमुक्त झाले तरी घर धनी दारू सोडेल का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सत्य कटू असते. ते सहजा सहजी पचवता येत नाही.