वाशिम, दि. 30 : सध्याच्या काळात पती पत्नीत भांडणे काही नवीन नाहीत. अनेकदा पती पत्नीतले भांडण- तंटे कोर्टातही जातात. अश्या परिस्थित घरात कलह निर्माण होतो आणि वैवाहिक जीवनात कडूपणा येतो. असाच कलह वाशिममधील एका जोडप्याच्या आयुष्यात झाला आहे. पण यांच्या भांडणाचे कारण जरा वेगळच आहे. स्वत:ची पत्नी घरी असलेल्या शौचालयचा वापर न करता बाहेर उघड्यावर जात असल्याची तक्रार एका व्यक्तीने केल्याची घटना घडली आहे.वाशिम येथील श्रीराम नामक एका व्यक्तीने आपल्या पत्नीबद्दलची तक्रार प्रशसनाच्या दरबारात केली आहे. शौचालय असून शौचालयाचा वापर न करणाऱ्यास दंड करावा तसेच माझी पत्नी शौचालय असतांना उघडयावर जाते तिच्या नावाने दंडाची पावती करावी अशी मागणी खुद्द रिसोड तालुक्यातील भापूर येथील श्रीराम(काल्पनिक नाव) यांनी उपकार्यकारी अधिकारी ,पंचायत विभाग जिल्हा परिषदेकडे केली आहे.श्रीराम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अनेक जण शौचालय असून शौचालयाचा वापर न करता उघडयावर जातात, अशा लोकांना दंड करावा असे न घडल्यास आपल्या देखरेख एस.बी.एम. कर्मचाऱ्याविरुध्द कोर्टात केस दाखल करावी लागेल. यात काही शंका नाही माझी पत्नी शौचालयाचा वापर न करता घेवून उघडयावर जाते. तिच्या नावे दंडाची नोटीस, पावती करावी अशी विनंती केली आहे. सदर तक्रारीची जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.याच वाशिम जिल्ह्यात घरात शौचालय बांधता यावं म्हणून संगीता आव्हाळे नावाच्या महिलेनं आपलं मंगळसूत्र गहाण ठेवल्याचीही घटनाही घडली होती.जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतिने उघडयावर शौचास न जाण्याबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे नागरिक जागृक झाल्याचे दिसून येत आहेत.
शौचालय असून बायको उघडयावर जाते, पतीची प्रशासन दरबारी तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 1:13 PM