- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक’ ही अभिनव संकल्पना राज्यात राबविली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० शहरांची निवड झाली आहे. या शहरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवर सायकलस्वारांसाठी स्वतंत्र ट्रॅक असतील.नागपूर, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव या शहरांची निवड केली आहे. या संकल्पनेचे नियोजन आणि कार्यान्वयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाने समिती स्थापन केलीे. अमरावतीचे दीपक अत्राम, ठाण्याचे रवींद्र पाठक हे समितीचे सदस्य तर बांधकाम विभागाचे सचिव हे सदस्य सचिव असतील. ही समिती रस्त्यांची निवड करेल. वाहनांची गर्दी, त्यातून होणाºया प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच सायकलिंगद्वारे नागरिकांचे आरोग्य सृदृढ करण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येईल.क्रीडा धोरण समितीक्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा मंत्री विनोद तावडे, खा. रामदास तडस, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, संजय केळकर, सुनील शिंदे, चंद्रदीप नरके, यशोमती ठाकूर, शशिकांत शिंदे, राहुल नावेकर, प्रवीण दरेकर यांची समितीत नेमली आहे. समितीत संभाजी पवार, प्रदीप गंधे, आदिल सुमारीवाला, दिलीप वेंगसरकर हे नामवंत क्रीडापटू अर्जून पुरस्कारार्थी काका पवार, गोपाळ देवांग, शिवछत्रपती पुरस्कारार्थी मकरंद जोशी, मंगल पांडे, क्रीडा संघटक रामदास दरणे, उदय देशपांडे यांचाही समावेश केला आहे.