शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Sachin Sawant Resigned: सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा; नाना पटोलेंवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 7:46 PM

Sachin Sawant angry over Nana Patole on Atul Londhe's appointment: काँग्रेसमध्ये पक्ष पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. यामुळे नाना पटोले यांनी अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्ते म्हमून नियुक्त केले आहे.

गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळणारे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे राजीनामा पाठविल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे (Atul Londhe) यांची नियुक्ती झाल्यामुळे ते नाराज होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे लोंढे हे खास मानले जातात. 

काँग्रेसमध्ये पक्ष पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्ते म्हमून नियुक्त केले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सचिन सावंत यांना प्रवक्ते पदावरून हटवून मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाच्या समितीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे सचिन सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. यामुळे सचिन सावंत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. 

या नाराजीतून सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी आपल्याला प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी ट्विटर हँडलवरून प्रवक्तेपदाचा उल्लेखही हटविला आहे. 

काँग्रेसमध्ये फेरबदल खालील प्रमाणेअतुल लोंढे मुख्य प्रवक्ते, तर डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौ-याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी, शाम उमाळकर, संजय बालगुडे, यांची व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे,  सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले