शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

सचिन शेळके खुनातील आरोपींच्या कोठडीत वाढ

By admin | Published: November 02, 2016 1:31 AM

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणात सात आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारी वाढ करण्यात आली

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणात सात आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारी वाढ करण्यात आली असून, त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. रूपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, ता. मावळ), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३, दोघेही रा. काले कॉलनी, पवनानगर, ता. मावळ), सचिन लक्ष्मण ठाकर (वय २६, रा. ठाकूरसाई , ता. मावळ), पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (वय ३३, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ), सूरज विलास गायकवाड (वय २२, रा. ठाकरवाडी, इंदोरी), नितीन शिवाजी वाडेकर (वय २२, रा. भांबोली, ता. खेड) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सातही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींना पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी सकाळी (१६ आॅक्टोबर) येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची हत्या केली होती. (वार्ताहर)