शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सचिन होणार विद्यार्थ्यांच्या ‘ग्रीन मिल्ट्री’चा अग्रदूत!

By admin | Published: August 27, 2015 5:21 AM

वडलांच्या कवितांमधील शब्दकळांचा प्राजक्त मनाच्या अंगणात निगुतीने जपणाऱ्या सचिन तेंडुलकरनं महाराष्ट्रभरातील लाखो शाळकरी मुलांच्या मनामध्ये हिरवाई जागविण्याच्या कल्पनेला होकाराचे

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

वडलांच्या कवितांमधील शब्दकळांचा प्राजक्त मनाच्या अंगणात निगुतीने जपणाऱ्या सचिन तेंडुलकरनं महाराष्ट्रभरातील लाखो शाळकरी मुलांच्या मनामध्ये हिरवाई जागविण्याच्या कल्पनेला होकाराचे खतपाणी घातले आहे. निरागस कोवळ््या हातांनी लक्ष-लक्ष झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करणारी नवी ‘ग्रीन मिल्ट्री’ तयार करण्याच्या मिशनचा सचिनने राजदूत व्हावे, या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बीजभावनेला आशेचा अंकुर फुटला आहे... क्रिकेटच्या मैदानात प्रेक्षकांसाठी आनंदाचे हिरवेगार गालिचे पसरणाऱ्या या विक्रमवीराने मुनगंटीवारांच्या विनंतीला त्याच्या राहत्या घरी दिलेला सकारात्मक प्रतिसाद अलगदपणे आनंदाच्या प्राजक्ताची बरसात करून गेला...साधेपणा आणि आपुलकी, निरपेक्षपणे काहीतरी चांगले करण्याची आंतरिक इच्छा... आणि एकदा काही ठरवले की बस्स... या निग्रहाची प्रचीती बुधवारी सचिनच्या घरी विनंती घेऊन पोहोचलेल्या मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांना आली. वाघ्र प्रकल्पासाठी काम करावे असे पत्र मंत्री मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर यांना पाठवले होते. दोघांचाही होकार आला. मात्र अमिताभचा आधी आल्याने काय करावे असा पेच मंत्र्यापुढे आला. त्यातून नवा मार्ग म्हणून सचिनने ‘ग्रीन मिल्ट्री’चे अ‍ॅम्बेसेडर व्हावे अशी विनंती करणारे पत्र घेऊन मुनगंटीवार स्वत:च सचिनच्या घरी पोहोचले. अत्यंत आपलेपणाने सचिन आणि अंजली यांनी सगळ्यांचे स्वागत केले. सचिन म्हणाला, मी आधी बाहेर जाऊन सगळ्यांसोबत फोटो काढून येतो, मग आपण बोलू... फोटोसेशन झाल्यानंतर सचिन पुन्हा आत आला आणि गप्पांमध्ये सहभागी झाला. सचिनच्या वतीने बोलताना त्याच्या सचिवांनी जुने काही अनुभव सांगितले. एमएमआरडीएने याआधी तेंडूलकरला विचारले, त्याने होकारही दिला. पण पुढे काहीच झाले नाही. तेव्हा आपण जे काही ठरवू त्याचा निश्चित असा कार्यक्रम असावा अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. तेव्हा मुंनगंटीवार यांनी वर्षभराचा कार्यक्रमच सचिनला दाखवला. आम्ही पंधरा दिवसात आपणास सविस्तर कार्यक्रम आणि पत्र देतो असेही ते म्हणाले.सचिनला आम्ही ‘ग्रीन मिल्ट्री’चे अ‍ॅम्बेसेडर व्हावे अशी विनंती करतोय असे म्हणत मुनगंटीवार यांनी सत्कार केला त्यावेळी, होय, ते मी पेपरातूनच वाचतोय... असे म्हणत सचिनने हळूच गुगली टाकली. तर वन विभागाचे महासंचालक अरविंद कुमार झा यांनी मात्र सचिनपुढे वेगळाच तर्क मांडला. झा म्हणाले, आपण बॅटींग करता, ती बॅट लाकडापासून बनवलेली असते, ज्या तीन स्टम्पचे रक्षण करता ते देखील लाकडाचेच... पर्यायाने तुम्ही कायम झाडांचे संरक्षण करत आलात आणि त्यातून अनेक विक्रमही केले... म्हणूनच आपण या ग्रीन मिल्ट्रीसाठी परफेक्ट आहात... सरकारच्या या अनोख्या वकिलीला सचिनसह सगळ्यांनी जोरदार हसून दाद दिली नसती तरच नवल... या भेटीदरम्यान वन विभागाच्या विविध योजनांची माहिती मुनगंटीवार यांनी सचिन तेंडूलकरला दिली. वन विभागातर्फे नागपूरात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या जन वन धन या प्रतिष्ठानामार्फत विक्री करण्यात येणारी विविध उत्पादने वनमंत्र्यांनी तेंडूलकरला भेट दिली.सचिन-अंजलीचा ताडोबासाठी आग्रहआम्हाला ताडोबाचे जंगल पहायचे आहे असा आग्रह सचिनने वनमंत्र्यांकडे धरला. मी आजपर्यंत तेथे गेलो नाही, तेथे राणी नावाचा वाघ आहे ना... असेही सचिन म्हणताच आम्हाला ताडोबा बघायचेच आहे हे सांगताना अंजली तेंडूलकर यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वहात होता. त्यावर आ. शेलार म्हणाले, वाघ्र प्रकल्पासाठी सचिनना अ‍ॅम्बेसेडर केले असते तर... आणि पुन्हा सगळे हास्यात बुडाले...ठरवले की बदल नाही... एकदा मी ठरवले की त्यात बदल करत नाही, पण जे काही करायचे त्याचे नियोजन पक्के असायला हवे... त्यातही मुलांसाठी काम करायला मला नक्कीच आवडेल... मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर असे म्हणाला आणि वनमंत्र्यांचा चेहरा सचिनच्या या अनोख्या औदार्याने खुलून गेला. आदिवासींनी बनवलेली बॅट घेऊन सचिन आनंदितसचिनने त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक बॅट हाताळल्या. यावेळी चंद्रपूरच्या आदीवासींनी बनवलेली अनेक रंगी लाकडाची बॅट जेव्हा त्याला दिली त्यावेळी सचिनने ती आनंदाने स्वीकारली.ग्रीन मिल्ट्री आहे तरी काय?शालेय विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये जसे शोर्य, वीरतेचे प्रशिक्षण दिले जाते त्याच धर्तीवर आता एनजीसी (नॅशनल ग्रीन कॉफर्स) चे स्वरुप शालेय स्तरावर वाढवले जाणार आहे. त्यालाच ग्रिन मिल्ट्री म्हटले आहे. मुलांमध्ये इको क्लब, नेचर क्लबच्या माध्यमातून आपल्या जंगलांविषयी, प्राण्याविषयी, पर्यावरणाविषयी जागरुकता तयार केली जाईल.वाघ वाचवणे ही केवळ मोजक्या अधिकाऱ्यांची जबाबदारी न रहाता त्याला लोकसहभागातून चळवळीचे रुप देण्याचा प्रयत्न वन विभाग करत आहे. जंगल जगले आणि वाढले तर वाघ वाढतील. म्हणून मुलांना वृक्षारोपण, वनीकरणाचे महत्व पटवून देण्याचे काम ही ग्रीन मिल्ट्री करेल.