शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

सचिनसाठी मिळेना क्रिकेटच्या पंढरीत जागा !

By admin | Published: June 22, 2016 8:00 AM

कोट्यवधी भारतीयांच्या मनात वास्तव्य करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी क्रिकेटच्या पंढरीत-मुंबईत जागा मिळत नसल्याच्या आश्चर्यकारक वास्तवाने त्याचे असंख्य चाहते बेचैन झाले आहेत.

चंद्रशेखर कुलकर्णीमुंबई, दि. २१ - कोट्यवधी भारतीयांच्या मनात वास्तव्य करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी क्रिकेटच्या पंढरीत-मुंबईत जागा मिळत नसल्याच्या आश्चर्यकारक वास्तवाने त्याचे असंख्य चाहते बेचैन झाले आहेत. लंडनच्या मादाम तुसॉ पासून अनेक ठिकाणी प्रतिष्ठापना झालेल्या सचिनच्या दोन शिल्पाकृती आजमितीस जागेच्या शोधात आहेत.

या परिस्थितीत बीकेसीतील मुंबई क्रिकेट असोसिएशन तरी आपल्या अंगणात सचिनसाठी जागा देईल का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तसे पाहिले तर पोट भरण्याची व्यवस्था करणाऱ्या डबेवाल्यांपासून मन आनंदाने भरणाऱ्या सचिनपर्यंत अनेक कलाकृतींवर अडगळीत पडण्याची वेळ आली आहे.

प्रख्यात कलाप्रेमी उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या आरपीजी आर्ट फाउंडेशनने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ मरिन ड्राइव्हवर त्याचा चेहरा असलेले मेटल आर्टपीस उभारले होते. जयदीप मेहरोत्रा यांची ही कलाकृती उभारण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. ती धातूतील शिल्पाकृती मरिन ड्राइव्हवर स्थानापन्न झाली. त्या निमित्ताने त्या लगतचा पट्टा स्वच्छ झाला. सुशोभितही झाला. पण सहा-सात महिन्यांच्या आतच ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियमपासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी पालिका आणि पुरातन वास्तू संवर्धन समितीकडे तक्रार करुन सचिनचे शिल्प हटविण्याची मागणी केली.

त्यानुसार आधी परवानगी देणाऱ्या पालिकेनेच यंदाच्या जानेवारीत आरपीजी फाउंडेशनला शिल्पाकृती हटविण्याची नोटीस बजावली. अलीकडेच पुन्हा नोटीस बजावली आणि सचिनचा आर्टपीस २४ तासांत तिथून हटविला गेला.विस्थापित झालेल्या सचिन तेंडुलकरला या मुंबापुरीत मोक्याची जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

आरपीजी फाऊंडेशनचा अशा कलाकृतींच्या उभारणीमागील हेतू ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ला साह्य करण्याचा आहे. त्या हेतुची खात्री पटल्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनीही सचिनला जागा मिळवून देण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या अनेक वॉर्डांमधील वाहतूक बेटांची व अन्य जागांची त्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. 

एमसीएचा पर्यायया परिस्थितीत बांद्रा कुर्ला संकुलातील एमसीएच्या विस्तीर्ण जागेत सचिनसाठी जागा मिळू शकते. अडचण इतकीच आहे, की ती जागा सार्वजनिक नाही. तसेच अशा होकारासाठी एमसीएतून कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. सी व्ह्यूच्या मार्गात सचिनचे शिल्पउच्चभ्रू वसाहती असलेल्या मरीन ड्राईव्हच्या नागरिकांनी सी व्ह्यू दिसत नसल्याची तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत पुरातन वास्तू समतिीने शिल्पामुळे पुरातन सौंदर्य खराब होत असल्याचे मत व्यक्त करीत शिल्पाला परवानगी नाकारली.

वस्तुत: हा प्रश्न केवळ सचिनच्या आर्टपीसपुरता नाही. तो कलेकडे पाहण्याच्या आणि त्याचवेळी शहराच्या स्वच्छतेचा, सौंदर्यीकरणाचाही आहे. देशाने स्वीकारलेल्या स्वच्छ भारत अभियानला हातभार लावण्यासाठी मुंबईत आरपीजी फाऊंडेशनने पुढाकार घेतला. शहराच्या सौंदर्यात भर टाकतील, स्वच्छतेच्या संस्कृतीचे अप्रत्यक्ष रोपण करतील अशा कलाकृती नामवंत कलाकारांकडून खरेदी करणाऱ्या फाऊंडेशनने त्या बसविण्यासाठी घेतलेल्या जागांच्या भाड्याचा खर्चही उचलला.

त्यात डबेवाल्यांच्या शिल्पाकृतीसह अन्य चार कलाकृतींचा समावेश आहे. वलय शेंडे, अरझान खंबाटा, जयदीप मेहरोत्रा आणि सुनील पडवळ आदी कलावंतांच्या कलाकृती त्यासाठी मिळविल्या गेल्या. पण त्यांच्या उभारणीत अनेक अडसर येत आहेत. उपनगरांपासून नरीमन पॉइंटपर्यंत अनेक ठिकाणी सार्वजनिक जागी अशा कलाकृती उभारण्याची कल्पना लोकांच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत आहे. 

जगभरात अनेक शहरांमध्ये या पद्धतीच्या कलाकृतींनी तेथील सौंदर्यात भर तर टाकलीच आहे. शिवाय त्या कलाकृती शहरांची ओळखही बनल्या आहेत. 

डबेवाल्यांच्या शिल्पालाही होकाराची प्रतीक्षामेट्रो जंक्शन येथे वलय शेंडे निर्मित डबेवाल्यांचे शिल्प बसविण्याचा या संस्थेचा मानस आहे. वांद्रे येथील कार्टर रोडला समुद्रालगत सुनील पडवळ यांनी तयार केलेली आगळी कलाकृती उभी राहणे अपेक्षित आहे. विचारांना चालना देतानाच डोळयाचे पारणे फेडणाऱ्या तसेच शहराच्या ओळखीला नवा दृश्य आयाम देणारी कला हे आपले वैभव आहे. त्याच्या साह्याने समाजातील विविधतेचा हा वारसा साजरा आणि वृद्धींगत करण्याचे हे एक माध्यम आहे.- हर्ष गोएंका