- ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 31 - उस्मानाबादेतील डोंजा गाव दत्तक घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अजून एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. खासदार सचिन तेंडूलकरने स्थानिक विकास निधीतून, येवल्यातील समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयाला तब्बल चाळीस लाखांचा निधी दिला आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार येवल्यातील अंगणगाव येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी शाळा गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत आहे. जिल्हयातील ही दुसरीच निवासी शाळा असून, या ठिकाणी 110 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र केवळ 40 विद्यार्थ्यांना शासकीय अनुदान मिळते.
सचिन तेंडूलकरला त्याचा भाऊ नितीन तेंडूलकरच्या माध्यमातून या संस्थेबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर सचिनने मदत करण्याचा निर्णय घेत जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून आपण चाळीस लाखाची मदत देत असल्याचं सांगितलं.