शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

Sadabhau Khot : "शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने घशात घातले अन् महिन्याभराच्या सरकारला जाब विचारताय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 2:29 PM

Sadabhau Khot Slams NCP Ajit Pawar : शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. घरांसह गोठ्याची पडझड झाली असून जनावरांचीही हानी झाली आहे. शेतीकामेही ठप्प पडली असून, रोजगार हिरावल्याने अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसांमागून दिवस लोटत असूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका तुम्ही लोकांनी घशात घातल्या" असं म्हणत अजित पवारांवर (NCP Ajit Pawar) हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कुणाला जाब विचारत आहात? ५० वर्षाची राजकीय कारकीर्द, ४ वेळा मुख्यमंत्री, २ वेळा कृषीमंत्री आपले साहेब तरी महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या का करतो?" असा सवाल खोत यांनी केला आहे. 

"शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका तुम्ही लोकांनी घशात घातल्या आणि महिन्याभराच्या सरकारला तुम्ही जाब विचारताय?" असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी विदर्भ दौरा सुरू केल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी टीका केली. या टिकेला उत्तर देताना मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरूनच बघावं लागतं असा टोला लगावला. 

विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस