शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सफाई कामगार धडकले पालिकेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2016 2:48 AM

महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांचा जाहीर निषेध करत थकीत वेतन द्या, कायदेशीर पीएफ, ईएसआयसी व अन्य सुविधा द्या, दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा

ठाणे : महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांचा जाहीर निषेध करत थकीत वेतन द्या, कायदेशीर पीएफ, ईएसआयसी व अन्य सुविधा द्या, दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, या मागण्यांसाठी मलनि:सारण व अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पालिकेने या कामगारांच्या सर्वच मागण्या मान्य केल्याने तूर्तास एक महिन्यापर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मलनि:सारण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना सहा महिन्यांचे वेतन अजूनही देण्यात आले नसल्याने या कर्मचाऱ्यांना घरे चालवताना अडथळे निर्माण होत आहेत. घंटागाडीच्या नवीन ठेकेदाराने जुन्या सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांना कामावर सामावून घेण्याचे कबूल करूनही त्यांना डावलले आहे. कंत्राटदाराने कायदेशीर वेतन व अन्य देय रकमा आणि कायदेशीर सुविधा वेळेत न पुरवल्यास मूळ मालक म्हणून प्रशासनाने कामगारांना ही रक्कम व सुविधा अदा करून ती रक्कम कंत्राटदाराच्या देय रकमेतून कापून घेण्याची कायदेशीर तरतूद आहे. परंतु, विविध विभागांतील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या कामगारांना न्याय मिळावा म्हणून बुधवारी श्रमिक जनता संघाने धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कायदेशीररीत्या या कामगारांना वेतन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी मान्य केले. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही पावले उचलली जातील. ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही. ज्या कामगारांना सामावून घेतलेले नाही, त्यांना ठेकेदारांनी सामावून घ्यावे आदींसह इतर मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. (प्रतिनिधी)