शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू -  संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 12:09 PM

Sanjay Raut : बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई :  बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

शुक्रवारी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच,  मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे.  मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

385 उमेदवार  रिंगणात बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत 58 प्रभागांसाठी मतदान होणार असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 428364 इतके मतदार असून त्यामध्ये  213536 पुरुष आणि 214834 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

1828 कर्मचारी नियुक्त बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी 1828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त सहा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 300 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना