नवी दिल्ली : साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून, सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे.त्यांच्या जाँयस्टिक या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. (Sahitya Akademi Award for Translation to Sonali Nawangul) सोनालींनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केलं असून त्या स्वतंत्र लिखाण ही करतात. स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख व मानपत्र अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. तर जयश्री शानभाग यांनी कोकणीत अनुवादित केलेल्या 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
सोनाली प्रकाश नवांगुळ,मूळ गाव..बत्तीस शिराळा,वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या सोनालीने घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या.त्यानंतर 2000 साली सोनाली कोल्हापुरात आली.तिने हेल्पर्स अॉफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत 2007 पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले.2007 साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन सोनाली संस्थेतून बाहेर पडली.
तिने स्पर्शज्ञान या मराठी या पहिल्या मराठी नोंदणीकृत भरलेलं पाक्षिकाची उपसंपादक म्हणून काम स्वीकारले.आजही ती अंधांसाठीच्या मराठी व हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीचे लेखन करणे तसेच विविध वृत्तपत्रांसाठीही सदर लेखन व प्रासंगिक लेखन करणे.याखेरीज तिच्या आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची नावे अशी... अनुवादित पुस्तके...ड्रीमरनर,मध्यरात्रीनंतर चे तास, वारसा प्रेमाचा व वरदान रागाचे. लहान मुलांसाठी..जॉयस्टिक,नर्मदा बचाव आंदोलनाच्या लढाऊ कार्यकर्त्या मेधा पाटकर,. सदर लेखनाचे पुस्तक..स्वच्छंद.