शिर्डी : साईबाबा समाधी शताब्दीसाठी ब्रँड अँबेसेडर नेमण्याचा वादग्रस्त निर्णय साईबाबा संस्थानने अखेर मागे घेतला़ साईभक्तच ब्रँड अँबेसेडर आहेत. सार्इंचा महिमा जगभर पोहोचविण्यासाठी अन्य कोणाचीही आवश्यकता नाही, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सांगितले.१ आॅक्टोबरपासून साई समाधी शताब्दी वर्ष सुरू होत आहे़ त्या पार्श्वभूमीवर प्रचार-प्रसारासाठी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिग्गज ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमण्याचा संस्थानचा मानस होता़ त्यासाठी काही ग्रामस्थही आग्रही होते़ मात्र, त्यावर सर्व स्तरातून टीका झाल्यावर संस्थानने जनभावना लक्षात घेत, हा निर्णय स्थगित केला.तिरुपती बालाजी येथे केस दान केले जातात, तसे शिर्डीत रक्तदानाचे महत्त्व वाढीस लागावे, यासाठी संस्थान प्रयत्नशील आहे़ रक्तदानाच्या कक्षाचे उद्घाटन हावरे यांच्या हस्ते झाले. देशात रक्ताचा ३५ लाख युनिटचा तुटवडा आहे़ त्यामुळे रक्तदानाला सेवाकार्याचे स्वरूप देण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे़ गरजूंना नाममात्र दरात तर थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येईल.
ब्रँड अँबेसेडर नेमण्याचा साई संस्थानचा निर्णय रद्द, आॅक्टोबरपासून शताब्दी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 2:36 AM