नागपूर : आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेल्या आॅल इंडिया वितरकांच्या व्यावसायिक मेळाव्यात साई पॉर्इंट होंडाला लागोपाठ सातव्यांदा आॅल इंडिया विनरचा बहुमान मिळाला आहे. साई पॉर्इंट होंडाने २०१६ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वाधिक २६०७ दुचाकी वाहने विकल्यामुळे साई पॉर्इंट होंडाला विशेष पुरस्कार देण्यात आला. साई पॉर्इंट होंडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप पाटील यांनी हा पुरस्कार होंडाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अयामा सान यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी होंडाच्या भारताच्या अध्यक्ष केईटा मुरामत्सू सॅन, उपाध्यक्ष (विक्री) वाय. एस. गुलेरिया, उपाध्यक्ष (सेवा) प्रभू नागराज उपस्थित होते. यावेळी बोलताना साई पॉर्इंट होंडाचे दिलीप पाटील म्हणाले, सातव्यांदा हा पुरस्कार स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. साई पॉर्इंट होंडामध्ये ग्राहकांना विक्री, सेवा, सुटेभाग यात दर्जेदार सेवा पुरविण्यात येत असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळाले असून, त्यामुळेच हा बहुमोलाचा पुरस्कार मिळाला आहे. २०२० पर्यंत एक लाख होंडा विकण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दिलीप पाटील हे एका शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत. ते यवतमाळ जिल्ह्याच्या मालखेड या गावातील मूळ रहिवासी आहेत. २०२५ पर्यंत ५० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची त्यांची मनीषा आहे. साई पॉर्इंट होंडाची नागपूर, मुंबई, ठाणे, यवतमाळ आणि विदर्भाच्या इतर ठिकाणी दुचाकीची डीलरशिप आहे. या ग्रुपतर्फे साई पॉर्इंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे दुचाकीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. २०२५ पर्यंत या फायनान्स कॉर्पोरेशनला बँकेत रूपांतरित करण्याचा मानस आहे. ग्रुपतर्फे साई आर्यमन मारुती सुझुकी गोवा, साई आर्यमन नेक्सा पणजी, साई पॉर्इंट सुपर कार्स, अंधेरी (मुंबई), साई पॉर्इंट सुपर कार पुणे आणि साई पॉर्इंट होंडा ग्रेट नाग रोड येथे डीलरशिप आहे. (वा.प्र.)
साई पॉइंट होंडा आॅल इंडिया विनर
By admin | Published: February 20, 2017 3:53 AM