मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे सरकार विरोधात भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, रस्तावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणाऱ्या सरकारने आता त्याच शेतकऱ्यांना चिंताग्रस्त केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांची सरकारने चेष्टा चालवली आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणाऱ्या सरकारने आता त्याच शेतकऱ्यांना चिंताग्रस्त केलं आहे. त्यामुळे भाजपकडून सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. तर मराठवाड्याच्या पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी पंकजा मुंडे ह्या उपोषणाला बसल्या होत्या, तर इतर ठिकाणही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे महाजन म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी भाजपकडून राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाणार आहे. सरकारने या विषयी त्वरित पावले उचलावीत. विजेचा प्रश्न सोडवावा. अन्यथा भाजपकडून त्या-त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर आंदोलने करावे लागतील असा इशारा महाजन यांनी सरकाराला दिला आहे.